४६ ग्राहकांना प्रत्येकी ५ लाख अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 07:35 PM2020-05-25T19:35:25+5:302020-05-25T19:36:43+5:30

सदनिका खरेदी करणाऱ्या ४६ ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सहारा प्राईम सिटी कंपनीला दिला आहे. तसेच, प्रत्येक तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि ग्राहकांनी दिलेली अग्रीम रक्कम १८ टक्के व्याजासह परत करण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार दणका बसला आहे.

Pay Rs 5 lakh each to 46 customers | ४६ ग्राहकांना प्रत्येकी ५ लाख अदा करा

४६ ग्राहकांना प्रत्येकी ५ लाख अदा करा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदनिका खरेदी करणाऱ्या ४६ ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासापोटी प्रत्येकी ५ लाख रुपये भरपाई अदा करण्यात यावी असा आदेश राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने सहारा प्राईम सिटी कंपनीला दिला आहे. तसेच, प्रत्येक तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि ग्राहकांनी दिलेली अग्रीम रक्कम १८ टक्के व्याजासह परत करण्यास सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे कंपनीला जोरदार दणका बसला आहे.
यासंदर्भात ग्राहकांनी आयोगामध्ये १५ तक्रारी दाखल केल्या होत्या. प्रकरणावर आयोगाचे अध्यक्ष ए. पी. भंगाळे व न्यायिक सदस्य ए. झेड. ख्वाजा यांच्यासमक्ष सुनावणी झाली. कंपनीला आदेशाचे पालन करण्यासाठी तीन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. कंपनीने गृह प्रकल्प सादर करताना ग्राहकांना विविध आकर्षक आश्वासने दिली होती. त्यामुळे ग्राहकांनी कंपनीच्या प्रकल्पातील सदनिका बुक केल्या होत्या व कंपनीला नियमानुसार अग्रीम रक्कम अदा केली होती. त्यानंतर कंपनीने निर्धारित वेळेत प्रकल्प पूर्ण केला नाही. प्रकल्पात आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या नाही. दरम्यान, कंपनीविरुद्ध ठिकठिकाणी न्यायालयीन प्रकरणे दाखल झाली.

Web Title: Pay Rs 5 lakh each to 46 customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.