शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

विम्याच्या दोन लाख रुपयावर नऊ टक्के व्याज द्या : नागपूरच्या अतिरिक्त ग्राहक मंचचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2019 22:26 IST

तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देओरिएन्टल इन्शुरन्सविरुद्धची तक्रार अंशत: मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या महिला ग्राहकाला विमा दाव्याच्या दोन लाख रुपयावर १७ जानेवारी ते २३ ऑक्टोबर २०१८ या विलंब कालावधीसाठी ९ टक्के व्याज अदा करण्यात यावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.लक्ष्मी मानवटकर असे महिला ग्राहकाचे नाव असून त्या केराडी, ता. पारशिवानी येथील रहिवासी आहेत. मंचच्या ग्राहक विधी सेवा निधीमध्ये ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देशही कंपनीला देण्यात आले आहेत. त्यातील २५ हजार रुपये तक्रारकर्तीला द्यायचे आहेत. तसेच, तक्रारकर्तीला तक्रार खर्चाकरिता ५ हजार व शारीरिक-मानसिक त्रासाकरिता १० हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. यापैकी ५ हजार रुपये ओरिएन्टल इन्शुरन्सने तर, १० हजार रुपये जयका इन्शुरन्स ब्रोकरेज कंपनीने द्यायचे आहेत. या निर्णयाचे पालन करण्यासाठी या कंपन्यांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर देय रकमेवर १२ टक्के व्याज लागू होईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.तक्रारीतील माहितीनुसार, लक्ष्मी मानवटकर यांचे पती अशोक शेतकरी होते. शेतीच्या उत्पन्नावर त्यांचे कुटुंब अवलंबून होते. अशोक यांचा गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेंतर्गत दोन लाख रुपयाचा विमा काढण्यात आला होता. २७ एप्रिल २०१७ रोजी अशोक यांचा अपघातात झाला. त्यामुळे त्यांचा १८ जून रोजी मृत्यू झाला. त्यानंतर लक्ष्मी यांनी विमा दाव्याची रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर केली. परंतु, कागदपत्रांच्या त्रुटीमुळे त्यांचा दावा नामंजूर करण्यात आला. परिणामी, त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर प्रतिवादी कंपन्यांनी लेखी उत्तर दाखल करून आपापली बाजू मांडली. तसेच, तक्रार खारीज करण्याची विनंती केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला. ओरिएन्टल इन्शुरन्सने ही तक्रार प्रलंबित असतानाच तक्रारकर्तीच्या बँक खात्यात दोन लाख रुपये जमा केले होते. त्यामुळे त्या रकमेवर केवळ व्याज देण्याचा आदेश देण्यात आला.यंत्रणा अकार्यक्षमया प्रकरणात मागणी केलेली सर्व कागदपत्रे तक्रारकर्तीने सादर करूनही विमा दावा अयोग्यपणे फेटाळल्याचे दिसते. ही राज्य सरकारची अतिशय चांगली विमा योजना आहे. परंतु, अकार्यक्षम यंत्रणेमुळे या योजनेचा लाभ पीडितांपर्यंत योग्यप्रकारे पोहचत नाही. या प्रकरणात यंत्रणेने वेळीच हस्तक्षेप केला असता तर, तक्रारकर्तीला मंचमध्ये तक्रार दाखल करण्याची गरज पडली नसती असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे