शरद पवारांचा वर्धा, यवतमाळ दौरा ‘पोस्टपोन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2021 22:21 IST2021-11-17T22:17:28+5:302021-11-17T22:21:12+5:30

Nagpur News राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वर्धा, यवतमाळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

Pawar's Wardha, Yavatmal tour 'postpon' | शरद पवारांचा वर्धा, यवतमाळ दौरा ‘पोस्टपोन’

शरद पवारांचा वर्धा, यवतमाळ दौरा ‘पोस्टपोन’

नागपूर: राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वर्धा, यवतमाळ दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या बैठका तसेच मेळाव्यानंतर पवार २० नोेव्हेंबर रोजी वर्धा व यवतमाळला जाणार होते. परंतु काही कारणांमुळे तो रद्द करण्यात आला आहे.

आता पवार १९ तारखेलाच मुंबईकडे रवाना होतील. हा दौरा रद्द करण्यात आलेला नसून लवकरच त्याचे नियोजन करण्यात येईल, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी कळविले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नागपूर जिल्हा प्रभारी माजी आ. राजेंद्र जैन यांनीदेखील पवार वर्धा, यवतमाळला जाणार नसल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

Web Title: Pawar's Wardha, Yavatmal tour 'postpon'