शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची चूक पवार करणार नाहीत : चंद्रशेखर बावनकुळे

By कमलेश वानखेडे | Updated: August 23, 2024 19:22 IST

सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा पवारांचा मनसुबा : चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

नागपूर : मुख्यमंत्री होता यावे यासाठी उद्धव ठाकरे भारतीय जनता पार्टीची साथ सोडू शकतात. तर ते आपल्या पाठीत केव्हाही पाठीत खंजीर खुपसू शकतात हे शरद पवारांना माहिती आहे. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करण्याची कधीही चूक करणार नाहीत, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शनिवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस व शरद पवार गटाच्या जाळ्यात फसले आहेत. त्यांना मुख्यमंत्री करणे हा केवळ एक खेळ होता. कॉंग्रेसमध्ये नाना पटोले, विजय वडेट्टीवार व बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदासाठी डोक्याला बाशिंग बांधून आहेत, कॉंग्रेसचे इतरही नेते इच्छुक आहेत. सोबतच सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा मनसुबा शरद पवारांचा आहे. यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी याचना करीत आहेत. महाविकास आघाडीत प्रचंड असंतोष पसरला आहे. अमित शहा यांच्या नावावर जसा खोटारडेपणा उद्धव ठाकरेंनी केला तसाच खोटारडेपणा ते शरद पवारांच्या नावाने करतील. मुख्यमंत्री पद मिळविण्याकरिता उद्धव ठाकरे दिल्लीला गेले होते, पण त्यांना तेथून फेटाळून लावले, असा दावाही बावनकुळे यांनी केला.

सात दिवसात जागावाटपाची चर्चा पूर्ण व्हावीमहायुतीमधील तिन्ही नेत्यांनी एकत्र येत आगामी सात दिवसात जागावाटपाबाबत चर्चा पूर्ण करावी, अशी भाजपची मागणी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी फार काळ उरलेला नाही. तिन्ही पक्ष महायुतीमध्ये लढणार असून इतर अकरा घटक पक्षांचाही विचार व्हावा. सिटिंग गेटिंगचा विचार सुरू आहे, तथापि, कोणत्याही सूचना अद्याप देण्यात आलेल्या नाहीत. सिटिंग गेटिंग मध्येही काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली. प्राथमिक स्तरावर स्थानिक स्तरावरच निर्णय होतात अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्त्व घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये कागलची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेसला सुटणार आहे. समरजीत घाडगे यांना लढायचेच असेल तर त्यांना कोण थांबविणार, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेSupriya Suleसुप्रिया सुळेUddhav Thackerayउद्धव ठाकरे