पक्ष चालवायचा म्हणून पवार हे देशमुखांचे समर्थन करतात; देवेंद्र फडणवीस यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 21:54 IST2021-11-20T21:53:53+5:302021-11-20T21:54:39+5:30
Nagpur News देशमुखांनी पैसे गोळा करण्याची मागणी केली पण पैसे गोळा केले का, असे म्हणून त्यांचे समर्थन करणे योग्य आहे का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पक्ष चालवायचा म्हणून पवार हे देशमुखांचे समर्थन करतात; देवेंद्र फडणवीस यांची टीका
नागपूर : पक्ष चालवायचा म्हणून शरद पवार हे अनिल देशमुख यांचे समर्थन करतात. पण पवार यांच्यासारख्या मोठ्या नेत्याकडून हे अपेक्षित नाही. देशमुखांनी पैसे गोळा करण्याची मागणी केली पण पैसे गोळा केले का, असे म्हणून त्यांचे समर्थन करणे योग्य आहे का, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शनिवारी रात्री नागपुरात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, अमरावतीत घटना झाली, ती कशामुळे झाली ? कुठलीही घटना त्रिपुरात घडली नसताना, कपोलकल्पित घटनेच्या आधारावर मोर्चे काढून हिंदूंची दुकाने तोडण्यात आली. यावर तथाकथित सेल्युलर का बोलत नाहीत, असा सवाल त्यांनी केला. प्रश्न कोणी निर्माण केला, यापासून दूर भटकून अशाप्रकारे भाजपवर आरोप करुन प्रश्न कधी सुटणार नाही, असेही ते म्हणाले.