शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व नागपूरवरून काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर पवार गटाचा संताप

By कमलेश वानखेडे | Updated: October 19, 2024 17:44 IST

Nagpur : उद्या काँग्रेसला तिकीट मिळाली तर राष्ट्रवादीची गरज पडणार नाही का ?

कमलेश वानखेडे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपूरच्या जागेवरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) मध्ये रस्सीखेच सुरू आहे. शुक्रवारी पूर्व नागपुरातील काँग्रेस नेत्यांनी बैठक घेत ‘सांगली पॅटर्न’चा इशारा दिला होता. शनिवारी शरद पवार गटाने पूर्व नागपुरात बैठक घेत काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला. उद्या काँग्रेसला तिकीट मिळाली तर राष्ट्रवादीची गरज पडणार नाही का, असा थेट सवालही काँग्रेस नेत्यांना करण्यात आला.

पूर्व नागपुरातील विभागीय कार्यालयात शरद पवार गटाची बैठक झाली. तीत शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे, विभागीय अध्यक्ष रविनीश पांडे, आकाश थेटे, रविंद्र इटकेलवार, प्रशांत बनकर, अस्वीन झवेरी, कपील आवारे, मोहन गुरुपंच, हेमंत चोरमार, पवन गावंडे, महेश ठाकरे आदी उपस्थित होते. काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दल अपमानास्पद भाषा वापरली जात असल्यावर आक्षेप घेत पदाधिकाऱ्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली. १५ वर्षांपासून पूर्व नागपुरात काँग्रेस पराभूत होत आहे. प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी धर्म पाळला. कोणत्या पक्षाला तिकीट द्यायची हे वरिष्ठ नेते ठरवतील. पण काँग्रेस नेत्यांचे असे हेखेखोरपणे वागणे योग्य नाही, अशी नाराजी व्यक्त करण्यात आली.

वेगवेगळे लढलो तेव्हा काँग्रेस एकही जागा जिंकली नाही२०१४ मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळी लढली. तेव्हा काँग्रेसला शहरात एकही जागा जिंकता आली नाही. हा इतिहास काँग्रेस नेत्यांनी जाणून घ्यायला हवा. काँग्रेसला तिकीट मिळत असेल तर राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी जोमाने काम करतील. पण काँग्रेसच्या नेत्यांची तारतम्य ठेवून बोलावे. काँग्रेस नेत्यांना वातावरण खराब करून अप्रत्यक्षपणे भाजपला मतदर करायची आहे का, असा प्रश्नही बैठकीत उपस्थित करण्यात आला.

टॅग्स :congressकाँग्रेसSharad Pawarशरद पवारnagpurनागपूर