रुग्णांना मिळेल औषधांची माहिती
By Admin | Updated: December 22, 2014 00:38 IST2014-12-22T00:38:27+5:302014-12-22T00:38:27+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) काय आहे काय नाही, याला घेऊन डॉक्टर आणि रुग्णांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहायचे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी

रुग्णांना मिळेल औषधांची माहिती
मेडिकल : झळकणार विविध माहितीचे फलक
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) काय आहे काय नाही, याला घेऊन डॉक्टर आणि रुग्णांमध्ये नेहमीच तणावाचे वातावरण राहायचे. अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी यावर उपाय म्हणून विविध माहितीचे फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. यात उपलब्ध औषधांची माहितीही रुग्णांना मिळणार आहे.
मेडिकलमध्ये काय आहे त्यापेक्षा काय नाही यावरच चर्चा रंगायची. लोकप्रतिनिधीही याच प्रश्नाला घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरायचे. मेडिकलच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण व्हायचा. यामुळे या पद्धतीमध्येच पारदर्शकता आणण्यासाठी डॉ. निसवाडे यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे. येत्या बुधवारपासून ते आकस्मिक व बाह्यरुग्ण विभागात उपलब्ध व उपलब्ध नसलेल्या औषधांच्या माहितीचे फलक लावण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यात किती व्हेंटिलेटर आहेत त्यातील किती रुग्णाला लावले आहेत याचीही माहिती रुग्णांना मिळणार आहे. ही सोय आतापर्यंत फक्त ‘एम्स’ रुग्णालयात उपलब्ध आहे.(प्रतिनिधी)
लवकरच रुग्णाची आॅनलाईन नोंद
मेडिकलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला आता आॅनलाईन आपल्या नावाची नोंद करता येणार आहे. ही सेवा लवकरच सुरू होईल. या विषयी माहिती देताना डॉ. निसवाडे म्हणाले, यामुळे रुग्णालयात नाव नोंदणी करणाऱ्या खिडक्यांवरची गर्दी कमी होईल. तसेच रुग्णाला तत्काळ उपचार मिळू शकेल. या पद्धतीचे काम अंतिम टप्प्यात आहे.