शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रक्त घटकांअभावी रुग्णांचा जीव टांगणीला

By admin | Updated: November 7, 2015 03:12 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्तघटक वेगळे करणारी यंत्रणा असली तरी दर्जा नियंत्रणासाठी ....

मेडिकलमध्ये मशीन स्थापन करण्यास उशीर : तर ‘एफडीए’ला हवे स्थापनेचे पत्रनागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) रक्तघटक वेगळे करणारी यंत्रणा असली तरी दर्जा नियंत्रणासाठी आवश्यक यंत्रणा नसल्याच्या कारणावरून अन्न व औषध प्रशासनाने (एफडीएने) ‘होल ब्लड’ला परवानगी देत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी नाकारली आहे. याला आता आठ दिवसांचा कालावधी होत आहे. विशेष म्हणजे मेडिकलच्या आदर्श रक्तपेढीत सोमवारी तीन आवश्यक मशीन आल्या, परंतु चार दिवस होऊन त्या स्थापना झाल्या नाहीत. दुसरीकडे जोपर्यंत स्थापनेचे पत्र मिळत नाही तोपर्यंत मंजुरी देणार नाही, अशी आडमुठेपणाची भूमिका एफडीएने घेतल्याने सामान्य व गरीब रुग्णांचा जीव टांगणीला लागला आला आहे. काही रुग्ण पदरमोड करून खासगी रक्तपेढीतून रक्तघटक विकत घेत आहेत.मेडिकलमध्ये गंभीर आजार, अपघात आणि बाळंतपणाच्या रुग्णांची संख्या अधिक असते. उपचारांदरम्यान आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकाची उपलब्धता महत्त्वाची ठरते. परंतु मेडिकलच्या रक्तपेढीतील त्रुटींवर एफडीएने बोट ठेवत कामकाज बंद ठेवण्याचा आदेश २८ आॅक्टोबर रोजी दिला. त्यानंतर ३० आॅक्टोबर रोजी केवळ ‘होल ब्लड’चा पुरवठा करण्याची परवानगी दिली. मात्र, ‘एलायझा रिडर’मशीनमधील दोष, सेल्स काऊंट मशीन, कोअ‍ॅग्युलो मीटर आणि पी.एच. मीटर मशीन नसल्याच्या त्रुटी काढत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी नाकारली. या मशीन्स उपलब्ध झाल्यावरच परवानगी देणार अशी भूमिका औषध प्रशासनाचे सहआयुक्त मोहन केकतपुरे यांनी घेतली. यामुळेच मोठा गोंधळ उडाला, असे मेडिकलच्या वरिष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. एफडीएने आणखी १५ दिवसांचा वेळ देत ‘कॉम्पोनेंट ब्लड’ला परवानगी दिली असती तर गरीब रुग्णांचे हाल झाले नसते.मेडिकल प्रशासनाने कधी नव्हे ते चार दिवसांत सुमारे २५ लाखांच्या चार मशीनची तडकाफडकी खरेदी केली. यातील तीन मशीन्स २ नोव्हेंबर रोजी रक्तपेढीत दाखलही झाल्या. परंतु चार दिवसांचा कालावधी होऊनही त्या स्थापनच झाल्या नाहीत. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या मशीन्स ‘मिड्री’ या कंपनीच्या आहेत. ही कंपनी गेल्या तीन दिवसांपासून नागपुरातील अभियंत्यांकडून यंत्राची जुळवाजुळव करण्याचे प्रयत्न करीत आहेत, परंतु त्यांना अद्यापही यश आले नाही. आता कंपनी स्वत:चे अभियंता बोलविणार आहे, परंतु यात आणखी एक-दोन दिवस जाणार असल्याने मशीन स्थापन होण्यास उशीर होणार आहे. मात्र, तोपर्यंत गरीब रुग्णांना रक्तघटकांसाठी धावाधाव करावी लागणार आहे. मेडिकलमध्ये उपचार घेत असलेल्या डेंग्यू, मलेरियाच्या गंभीर रुग्णांसह इतरही रुग्णांना ‘प्लेटलेट’, ‘प्लाझमा’, ‘रेड ब्लड सेल्स’ आणि ‘व्हाईट ब्लड सेल्स’ची गरज पडते. परंतु परवानगीच नसल्याने गेल्या तीन दिवसांपासून मेडिकलच्या रक्तपेढीत या घटकांचा ठणठणाट आहे. याचा फायदा घेऊन काही खासगी रक्तपेढीतील एजंट वॉर्डा-वॉर्डात फिरून गरजूंना हेरून दुप्पट भावाने हे रक्तघटक उपलब्ध करून देत आहे. (प्रतिनिधी)