मेडिकलमध्ये रुग्णाची आत्महत्या

By Admin | Updated: August 9, 2015 02:29 IST2015-08-09T02:29:45+5:302015-08-09T02:29:45+5:30

नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली.

Patients commit suicide in medical | मेडिकलमध्ये रुग्णाची आत्महत्या

मेडिकलमध्ये रुग्णाची आत्महत्या

नागपूर : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयात (मेडिकल) उपचार घेत असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाने शुक्र वारी मध्यरात्री गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने रुग्णालयात खळबळ उडाली आहे.
बुद्धदास अमित बोरकर (६५) रा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील मोहरना, असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुद्धदास बोरकर यांना काही दिवसांपूर्वी मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे त्याच्यावर तीन वेळा बायोप्सी (पॅथालॉजी परीक्षणाकरिता शरीराचा लहानसा भाग कापणे) करण्यात आली होती, परंतु याचा अहवाल अचूक येत नव्हता. अखेर नातेवाईकांनी कंटाळून बुद्धदास यांना ३० जुलै रोजी मेडिकलच्या शल्यशस्त्रक्रियेचा वॉर्ड क्र. १२ मध्ये भरती केले. येथे आल्यापासून त्यांच्या वागण्यात बदल झाला होता. शुक्रवारी त्याच्या देखभालीसाठी त्याची पत्नी सोबत होती.
रात्री १.३० वाजताच्या सुमारास बुद्धदासच्या पत्नीला जाग आली असताना ते खाटेवर दिसून आले नाहीत.
तिने वॉर्ड व परिसरात त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु ते कुठेच आढळून आले नसल्याने स्वच्छतागृहाची तपासणी केली असता खिडकीच्या गजाला दुप्पटा अडकवून बुद्धराज लटकलेले असल्याचे दिसून आले. तिने लागलीच आरडाओरड केली.
परिचारिका व अटेन्डटने धावत येऊन त्यांना खाली उतरविले. डॉक्टरांनी तपासणी केल्यावर त्यांना मृत घोषित केले. या प्रकारामुळे वॉर्डातील रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. कॅन्सरपीडित असल्या कारणाने बोरकर यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. अजनी पोलीस पुढील तपास करीत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Patients commit suicide in medical

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.