आठ दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:07 IST2020-12-09T04:07:51+5:302020-12-09T04:07:51+5:30

नागपूर : नोव्हेंबर महिन्यात दिवसाकाठी २०० ते ३०० दरम्यान रुग्ण दिसून यायचे. डिसेंबर महिन्यात या रुग्णसंख्येत वाढ झाली. मात्र ...

The patient population remained stable for eight days | आठ दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर

आठ दिवसांपासून रुग्णसंख्या स्थिर

नागपूर : नोव्हेंबर महिन्यात दिवसाकाठी २०० ते ३०० दरम्यान रुग्ण दिसून यायचे. डिसेंबर महिन्यात या रुग्णसंख्येत वाढ झाली. मात्र मागील आठ दिवसापासून ही रुग्णसंख्या ४०० ते ५०० दरम्यान स्थिर आहे. मंगळवारी ३९४ रुग्णांची वाढ झाली तर ६ रुग्णांचा जीव गेला. रुग्णांची एकूण संख्या ११५३२५ झाली असून मृतांची संख्या ३७५४ वर पोहचली आहे. मागील दोन दिवसाच्या तुलनेत आज चाचण्यांची संख्या पाच हजारांच्या घरात गेली.

नागपूर जिल्ह्यात नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यापर्यंत रोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या ३०० च्या आत होती. मात्र, शेवटच्या आठवड्यात ही रुग्णसंख्या वाढून ४०० वर गेली. डिसेंबर महिन्यात आतापर्यंत ४०० ते ५०० दरम्यान रुग्णसंख्या दिसून येत आहे. १ तारखेला ५१५, २ तारखेला ४५३, ३ तारखेला ५३६, ४ तारखेला ४२२, ५ तारखेला ५२७, ६ तारखेला ३०८, ७ तारखेला ४०५, ८ तारखेला ३९४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. थंडी व प्रदूषणात वाढ झाल्यास आणि फिजिकल डिस्टन्सिंग व मास्क वापराच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्यास कोरोना वाढू शकतो, अशी शंका तज्ज्ञानी वर्तवली आहे. नागपूर जिल्ह्यात आज चाचण्यांची संख्या वाढून ५३४७ वर गेली. ३४५ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्यांची संख्या १०५८६२ झाली आहे. ५७०९ रुग्ण उपचाराखाली आहेत.

-जिल्हाबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण ७४.५० टक्के

जिल्हा माहिती कार्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, मागील आठ दिवसात जिल्हाबाहेरील २४ रुग्ण आढळून आले. धक्कादायक म्हणजे, तेवढ्याच रुग्णांच्या मृत्यूची नोंदही झाली आहे. आतापर्यंत जिल्हाबाहेरील ५३२ रुग्णांचे मृत्यू झाले असून ७१४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ७४.५० टक्के आहे. तज्ज्ञाच्या मते, जिल्हाबाहेरुन येणारा कोरोनाबाधित रुग्ण हा उशिरा व गंभीर स्वरुपात रुग्णालयात येतो. यामुळे आजाराची गुंतागुंत वाढलेली असते. पन्नाशी गाठलेल्या प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाने लक्षणे असो किंवा नसो त्यांनी कोविड हॉस्पिटलमध्ये जाऊन तपासणी करणे, आवश्यक असल्याचे मतही त्यांनी नोंदविले.

::कोरोनाची आजची स्थिती

-दैनिक संशयित : ५३४७

-बाधित रुग्ण : ११५३२५

_-बरे झालेले : १०५८६२

- उपचार घेत असलेले रुग्ण : ५७०९

- मृत्यू : ३७५४

Web Title: The patient population remained stable for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.