शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पतंगीच्या हुल्लडबाजीत २० वर जखमी

By admin | Updated: January 16, 2017 01:54 IST

मकरसंक्रांतीचा दुसरा दिवस रविवार सुटीचा आल्याने शहरातील विविध भागात पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

दुचाकीस्वाराच्या करंगळीला लागले पाच टाके नागपूर : मकरसंक्रांतीचा दुसरा दिवस रविवार सुटीचा आल्याने शहरातील विविध भागात पतंगोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. बंदी असतानाही जास्तीत जास्त पतंग कापण्यासाठी अनेकांनी नायलॉनच्या मांजाचा वापर केला. या मांजाने दिवसभरात अनेक जण जखमी झाले. रविवारी मेयो, मेडिकलमध्ये २० वर रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. एका दुचाकीस्वाराची मांजामुळे करंगळी चिरली. नॉयलॉन मांजावर बंदी असलीतरी दुसऱ्या दिवशीही याची सर्रास विक्री सुरू असल्याचे दिसून आले. यामुळे रात्री उशिरापर्यंत माजांमुळे जखमी रुग्णांची संख्या वाढत होती. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी ९ वाजता हेमंत महाकाळकर (५०) रा. बेलदारनगर, नरसाळा, दिघोरी हे किराणा दुकान उघडण्यासाठी अ‍ॅक्टीव्हा मोपेडने घरून सक्करदरा मिरची बाजाराकडे जात होते. त्याचवेळी एका दूध विक्रेत्याच्या गाडीला मांजा गुंडाळला आणि तो खाली पडला. त्याच्या मागाहून येणारे महाकाळकर यांच्या हेल्मेटमध्ये मांजा फसला. महाकाळकर हे मान वाचविण्याचा प्रयत्न करीत असतानाच मांजाने त्यांची करंगळी चिरली. अचानक झालेल्या या अपघातामुळे पाच ते सात वाहने एकमेकांवर आदळली. प्रत्यक्षदर्शी एका दुकानदाराने या घटनेची माहिती नायलॉन मांजाविरोधात जनजागृती करणारे किंग कोबरा आॅर्गनायझेशन यूथ फोर्सचे अध्यक्ष अरविंदकुमार रतुडी यांना दिली. रतुडी यांनी संघटनेचे कार्यकर्ता डॉ. अविनाश गोनेवार व डॉ. किरण पांडे यांच्यासोबत घटनास्थळी पोहचून महाकाळकर यांच्यावर प्राथमिक उपचार केले नंतर सक्करदरा चौकातील इस्पितळात दाखल केले. तिथे महाकाळकर यांच्या करंगळीला पाच टाके लावण्यात आले. या घटनेसह मेयो, मेडिकलमध्ये २० वर किरकोळ जखमी रुग्णांनी उपचार घेतले. शनिवारी गोळीबार चौक निवासी बाबू पवनीकर (२०) पतंग उडवित असताना दोन मजली इमारतीवरून खाली पडला. त्याला गंभीर अवस्थेत मेयो रुग्णालयाच्या वॉर्ड क्र. २ मध्ये भरती करण्यात आले होते. रविवारी त्यांच्या नातेवाईकांनी मेयोमधून एका खासगी इस्पितळात दाखल केले. (प्रतिनिधी) पक्षी अडकले मांज्यात झाडावर गुंतलेल्या पतंगीच्या मांजामुळे दरवर्षी पक्ष्यांवर संक्रांत येते. यावर्षीही शेकडो पक्षी अडकल्याचे हेल्प फॉर अ‍ॅनिमल नागपूर व पीपल फॉर अ‍ॅनिमल यांचे म्हणणे आहे. परंतु लोकांच्या नजरेत आलेल्या चार पक्ष्यांना जीवनदान देण्यास या संघटनेला यश आले आहे. यात सिरसपेठ येथील एका झाडात नायलॉन मांजात अडकलेल्या घुबडाला पीयूष आकरे यांनी सुखरूप बाहेर काढले. इतवारी परिसरात अमूर फोलकॉन पक्षी असाच मांजामध्ये अडकलेला होता. विश्वजीत उके यांना याची माहिती मिळताच त्यांनी या पक्ष्याची मांजातून सुटका केली. मांजा आडवा आल्यामुळे अचानक कावळा जमिनीवर आपटला. स्वप्निल बोधाने यांनी डॉ. मयूर काटे यांचा सल्ला घेऊन कावळ्यावर प्राथमिक उपचार करून त्याला निरीक्षणात ठेवले. बेसा रोड गीतानगर येथील ५० फूट उंचीच्या हायमास्ट दिव्यावरील मांजात पोपट अडकला. सचिन काकडे व स्वप्निल बोधाने यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मांजातून पोपटाची सुटका केली.