शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

गुण पासचे, निकाल नापास!

By admin | Updated: August 7, 2015 02:44 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ प्रथम वर्षाचे काही विद्यार्थी उत्तीर्ण असूनदेखील गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे.

‘बीकॉम’चे विद्यार्थी संकटात : खासगी शिकवणी चालकांची फूस?नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ‘बीकॉम’ प्रथम वर्षाचे काही विद्यार्थी उत्तीर्ण असूनदेखील गुणपत्रिकेत अनुत्तीर्ण दाखविण्यात आले असल्याची बाब समोर आली आहे. विद्यापीठाच्या या चुकीमुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांचे निकाल रखडलेले आहेत. अखेर ‘बीकॉम’च्या प्रथम वर्षाचे निकाल जाहीर झाले अन् अनेक विद्यार्थ्यांना धक्काच बसला. सुमारे ८२ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. गुणपत्रिका पाहिल्या असत्या काही विद्यार्थी उत्तीर्ण असूनदेखील त्यांना अनुत्तीर्ण दर्शविण्यात आले आहे.‘लोकमत’कडे असलेल्या काही गुणपत्रिकांमध्ये ही बाब स्पष्टपणे दिसून येत आहे. ‘पीएलआय’ व ‘इडीव्ही’ या विषयाची लेखी परीक्षा ही ७० गुणांची असते, तर अंतर्गत मूल्यमापनाचे ३० गुण असतात. नियमांनुसार या लेखी परीक्षेत २५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण असतो. परंतु अनेक विद्यार्थ्यांना ३० हून अधिक गुण मिळाले आहेत, तरीदेखील त्यांना अनुत्तीर्ण दाखविण्यात आले आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची ‘एटीकेटी’ची संधीदेखील हुकली असून संपूर्ण वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक चुकांमुळे असे घडले असल्याचे मान्य केले. परंतु अशा चुका काही मोजक्या विद्यार्थ्यांबाबत घडल्या असून त्यांच्या गुणपत्रिका नव्याने देण्यात येतील व त्यांना त्या विषयांत उत्तीर्ण दाखविण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.विद्यापीठात आंदोलन, कार्यकर्ते ताब्यातविद्यापीठाने घाईगडबडीत निकाल लावण्याच्या नादात विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळ केल्याचा आरोप करत ‘आप’च्या छात्र युवा संघर्ष समितीच्यावतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुन्हा तपासणी व्हावी, विद्यापीठाच्या सर्व परीक्षांचे निकाल हे त्वरित लावावेत, डॉ.धवनकर प्रकरणातील योग्य माहिती देण्यात यावी, मोहता सायन्सच्या विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशा विविध मागण्या छात्र युवा संघटनेच्यावतीने करण्यात आल्या. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी पोलिसांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. आंदोलकांमध्ये नागपूर संयोजक कृतल वेळेकर यांच्यासह भाग्यश्री व्यवहारे शुभम मिरे, मयुरी पौनीकर, प्रिया जैन, अंकिता नखाते, गुलशन ठाकरे, पावन पंचभाई, नदीम, अभिलाष गजभिये, विश्वास देलोरे, प्रभात अग्रवाल, प्रतिक मिरे, मनीष गिरडकर, सोनू फटिंग आदींचा समावेश होता.