महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालकपदी परेश भागवत
By आनंद डेकाटे | Updated: July 25, 2024 15:47 IST2024-07-25T15:46:04+5:302024-07-25T15:47:13+5:30
Nagpur : याआधी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात होते कार्यरत

Paresh Bhagwat as Nagpur Regional Director of Mahavitaran
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महावितरणच्या नागपूर प्रादेशिक संचालक पदाची सुत्रे परेश भागवत यांनी स्विकारली. भागवत याआधी महावितरणच्या प्रकाशगड या मुख्यालयात मुख्य अभियंता (देयके व महसुल)) या पदावर कार्यरत होते. प्रादेशिक संचालक या पदावर थेट निवड पद्धतीने त्यांची पदोन्नती झाली आहे. त्यांना विद्युत क्षेत्रात २७ वर्षे सेवेचा प्रदीर्घ अनुभव आहे.
नागपूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, चंद्रपूर आणी गोंदिया या पाच परिमंडलाचा समावेश आहे. परेश भागवत हे कोल्हापूरचे मुळ रहिवासी आहेत. भागवत हे ते १९९७ साली तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत दाखल झाले. ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरण कार्यरत असून पारदर्शक आणि उच्च दर्जाची सेवा देण्यास आपण कटिबद्ध असल्याचे मनोगत भागवत यांनी आपला पदभार स्विकारतांना व्यक्त केला.
याप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अधीक्षक अभियंते मंगेश वैद्य, संजय वाकडे, महाव्यवस्थापक (वित्त) अतुल राऊत, महाव्यवस्थापक (मानव संसाधन) रुपेश देशमुख, सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे, सहाय्यक व्यवस्थापक (मानव संसाधन) प्रंजली कोलारकर, उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर यांचेसह अनेक अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते.