शहरं
Join us  
Trending Stories
1
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
2
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
3
स्वाती मालिवाल मारहाण: विभव कुमार यांना मुख्यमंत्री निवासस्थानातून अटक, पोलीस ठाण्यात धक्काबुक्की
4
Sharmila Thackeray : "बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, शिवसेना उबाठा...."; शर्मिला ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
5
"उबाठानं काँग्रेससमोर लोटांगण घातलंय, ते लीन झालेत आणि आता विलीनीकरणही होईल"
6
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
7
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
8
'महिलांचा आदर कसा करावा हे..'; हिजाब घातलेल्या मुलीला पाहून शाहरुखची थक्क करणारी रिॲक्शन
9
भाजपाचं 'अब की बार ४०० पार' कसं होणार?; विनोद तावडेंची भविष्यवाणी, गणित मांडलं
10
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
11
मोहिनी एकादशी: शुभ योगांत ‘असे’ करा पूजन, मिळेल उत्तम फल; पाहा, मुहूर्त अन् काही मान्यता
12
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
13
मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयातून १.६४ लाख रुपये जप्त; ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा
14
Swati Maliwal : स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video आला समोर; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
15
"हिंदुत्व भेकडासारखं पळून जाऊन...", किरण मानेंनी सत्ताधाऱ्यांचा घेतला खरपूस समाचार
16
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?
17
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
18
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
19
Share Market News : 'या' सरकारी कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 'ऑल टाईम हाय'वर; शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले

पालकांनो सावधान ! मुलांकडे वाहतूक परवाना आहे ना ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 8:44 PM

उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत.

ठळक मुद्देमुलांकडून नियमभंगाची पालकांना शिक्षा : वाहतूक नियम मोडणे पडले महागातमागील वर्षी विशेष मोहिमेदरम्यान सहाशेहून अधिक पालकांवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उपराजधानीत वाहनचालकांकडून वाहतूक नियम मोडण्याचे प्रमाण वाढले असून अनेक शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थी तर बेदरकारपणे वाहने दामटताना दिसून येतात. मात्र असे प्रकार आता मुलांच्या पालकांची डोकेदुखी वाढविणारे ठरणार आहेत. मागील वर्षी वाहतूक विभागाने अशा विद्यार्थ्यांविरोधात तीन दिवस विशेष मोहीम राबविली होती. यात सुमारे तीन हजार विद्यार्थी पोलिसांच्या  सापळ्यात  अडकले, तर मुलांनी केलेल्या नियमभंगासाठी सहाशेहून अधिक पालकांना कारवाईला सामोरे जावे लागले. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे विचारणा केली होती. २०१७ मध्ये नियम तोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी मोहीम राबविण्यात आली होती का, किती विद्यार्थ्यांवर कारवाई झाली व पालकांना काही दंड झाला का, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार २०१७ मध्ये २६ जुलै ते २८ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. या मोहिमेदरम्यान २,९४२ विद्यार्थ्यांवर नियम न पाळल्याबद्दल कारवाई करण्यात आली. तर मुलांनी नियम तोडल्याबद्दल ६२६ पालक किंवा वाहनमालकांवर कारवाई करण्यात आली. या कालावधीत १,१९२ वाहने ताब्यातदेखील घेण्यात आली. सर्वाधिक कारवाई ही वाहतूक पोलिसांच्या ‘चेंबर-२’द्वारे करण्यात आली. त्यांनी ८३८ विद्यार्थ्यांवर तसेच २३२ पालकांवर कारवाई केली. तर ४९४ वाहने ताब्यात घेतली.तीन दिवसांची कारवाई, कितपत प्रभावी ?दरम्यान, नागपूर शहरात अनेक विद्यार्थी परवान्याशिवायच वाहने चालविताना दिसून येतात. शिवाय ‘ट्रीपल सीट’, सिग्नल तोडणे, गाडी चालविताना मोबाईलवर बोलणे, अतिवेग इत्यादी प्रकारे वाहतुकींच्या नियमांचा भंग करण्यात येतो. मागील वर्षी तीन दिवस कारवाई चालली. मात्र जर विद्यार्थी व पालकांमध्ये शिस्त आणायची असेल तर कारवाईचे प्रमाण वाढविण्याची गरज असून अशी विशेष मोहीम नियमितपणे राबविली गेली पाहिजे, असे मत अभय कोलारकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीCrimeगुन्हा