शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
2
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
5
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
6
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
7
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
8
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
9
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
10
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
11
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
12
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
13
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
14
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
15
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
16
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
17
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
18
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
19
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
20
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार

मेडिकल कॉलेज इस्पितळात पक्षाघाताच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2018 9:54 PM

वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसकाळच्या वेळेत रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसीस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असे म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे ‘पॅरालिसीस’ होतो. त्यामुळे शरीराच्या काही विशिष्ट अवयवांवर नियंत्रण ठेवता येत नाही. स्वत:च्या इच्छेप्रमाणे हात किंवा पाय हलवता येत नाही. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोर जातो. तोंड वाकडे होणे, पायांमध्ये कमजोरी येणे, तोल जाणे, चालताना त्रास होणे, बोलण्यात फरक पडणे, अंधुक दिसणे ही पक्षाघाताची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. आनुवंशिकता, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयविकाराचा सौम्य झटका किंवा हृदयघात, मधुमेह, लठ्ठपणा, झोपेदरम्यान अनियमित श्वासोच्छवास, ३५ वर्षाखालील धूम्रपान करणाऱ्या महिलांद्वारे गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, कामाचा ताण व कामाचे अनियमित स्वरूप, स्पर्धात्मक वातावरण, पुरेशा झोपेचा अभाव, पॅकेटमधील खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पक्षाघात होतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पक्षाघाताचे रुग्ण वाढल्याचे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाय. व्ही. बन्सोड यांचे म्हणणे आहे. त्यांच्यामते, नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत थंडी पडते. आपले रक्त काही प्रमाणात जाड होते. याला इतरही घटक कारणीभूत ठरतात. परिणामी, पक्षाघात येतो. सध्या मेडिकलमध्ये रोज दोन-तीन रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यात सकाळच्यावेळेत येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.गोल्डन अवरमध्ये उपचार आवश्यकपक्षाघाताची लक्षणे दिसताच उपचार मिळाल्यास या आजराचे घातक परिणाम कमी करता येतात. यामुळे रुग्णाला ‘गोल्डन अव्हर’मध्ये उपचार मिळणे आवश्यक आहे. परंतु चोर पावलांनी येणारा हा आजार रात्री झोपत आल्यास सकाळी रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच उशीर होतो. परिणामी, सतर्क असणे आवश्यक आहे.डॉ. वाय. व्ही. बन्सोडविभाग प्रमुख, औषधवैद्यक शास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य