शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
2
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
3
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
4
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
5
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
7
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
8
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
9
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
10
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
11
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
12
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
13
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
14
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
15
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
16
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
17
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड
18
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
19
Storage Technologies and Automation : पहिल्याच दिवशी शेअरची किंमत दुप्पट; ₹७८ चा 'हा' स्टॉक पोहोचला ₹१५५ पार
20
भर चौकात महिलेने घातला गोंधळ, रस्त्यावरच उतरवायला लागली कपडे, पोलिसांशी घातला वाद. अखेर...  

काठ्या बाळगून पथसंचलन : सरसंघचालकांना न्यायालयाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 8:02 PM

काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयात मोहनीश जबलपुरे यांच्या पुनर्विचार अर्जावर सुनावणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काठ्या बाळगून पथसंचलन करण्यासंदर्भातील प्रकरणामध्ये सत्र न्यायालयाने बुधवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, पथसंचलन व्यवस्था प्रमुख अनिल भोकारे व कोतवाली पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावून येत्या ११ डिसेंबरपर्यंत उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिलेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. एम. वैद्य यांच्यासमक्ष प्रकरणावर सुनावणी झाली.या प्रकरणाचा तपास करून दोषी व्यक्तींविरुद्ध एफआयआर नोंदविला जावा याकरिता सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल केला आहे. २८ मे २०१८ रोजी पथसंचलन करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पोलीस उपायुक्तांनी २६ मे २०१८ रोजी परवानगी दिली होती. ही परवानगी देताना कार्यक्रमात काठ्या, घातक शस्त्रे, ज्वलनशील पदार्थ व स्फोटके बाळगायची नाहीत, शस्त्रांचे प्रदर्शन करायचे नाही, आतषबाजी करायची नाही यासह विविध अटी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच, अटींचे उल्लंघन केल्यास कार्यक्रमातील प्रत्येक सदस्यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. असे असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सार्वजनिक रस्त्यांवर काठ्यांसह पथसंचलन केले. संघाची ही कृती समाजामध्ये दहशत पसरविणारी आहे असे जबलपुरे यांचे म्हणणे आहे.१२ आॅक्टोबर २०१८ रोजी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने त्यांचा अर्ज खारीज केला. संघाने कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचविण्यासाठी किंवा शस्त्र म्हणून वापरण्यासाठी काठ्या बाळगल्या नाहीत असे निरीक्षण त्या निर्णयात नोंदविण्यात आले. परिणामी, जबलपुरे यांनी सत्र न्यायालयात रिव्हिजन अर्ज दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले आहे.

 

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघCourtन्यायालय