पाकचा कर्णधार बाबर आझमवर बलात्काराचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 04:11 IST2020-12-02T04:11:27+5:302020-12-02T04:11:27+5:30
‘आझमची पाक संघात निवड झाली नसतानापासून मी त्याचा खर्च करायची. २०१४ ला तो पाक संघात दाखल होताच त्याची भाषा ...

पाकचा कर्णधार बाबर आझमवर बलात्काराचा आरोप
‘आझमची पाक संघात निवड झाली नसतानापासून मी त्याचा खर्च करायची. २०१४ ला तो पाक संघात दाखल होताच त्याची भाषा आणि देहबोली बदलली. पुढच्या वर्षी मी लग्नाचा विषय काढताच त्याने नकार दिला. २०१६ ला मी गर्भवती असल्याची त्याला माहिती दिली, तेव्हापासून त्याची माझ्यासोबतची वागणूकदेखील बदलली. त्याने मारहाणदेखील केली. आम्ही घरून पळून गेल्यामुळे मी घरच्यांकडे हे सांगू शकत नव्हते. आझमने मला गर्भपात करण्यास सांगितले. त्याचवेळी २०१७ ला मी बाबरविरुद्ध नसीराबाद पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. दहा वर्षे शोषण केल्यानंतर आझमने मला ठार मारण्याचीदेखील धमकी दिली,’ अशी कैफियत या महिलेने मांडली.