शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नागपूर HSC 2018; पेंटरच्या मुलीचे सप्तरंगी यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 11:01 IST

कष्टाच्या बळावर आयुष्यात रंग भरणारे सप्तरंगी यश तिने खेचून आणले. ही यशोगाथा आहे संजना विनोद टेंभुर्णे या मुलीची. विपरीत परिस्थितीला मागे टाकूण तिने वाणिज्य शाखेतून ९४ टक्के गुण प्राप्त केले.

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वडील लोकांच्या घराच्या भिंती रंगविणारे हातमजूर; मात्र स्वत:चे राहायला घरही नाही. मामाच्या आधाराने ‘वन रूम वन किचन’मध्ये राहणारे हे कुटुंब. घरी अभ्यासाला बसायलाही पुरेशी जागा नाही. गरिबीत असल्याने काय करावे, असा संभ्रम व भीतीही वाटायची, पण अपार कष्ट करण्याची तयारीही होती. रात्री सर्व झोपले की किचनमध्ये जाऊन अभ्यास करायचा. या कष्टाच्या बळावर आयुष्यात रंग भरणारे सप्तरंगी यश तिने खेचून आणले. ही यशोगाथा आहे संजना विनोद टेंभुर्णे या मुलीची. विपरीत परिस्थितीला मागे टाकूण तिने वाणिज्य शाखेतून ९४ टक्के गुण प्राप्त केले.गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलींना गुणवत्तेचा मार्ग दाखविणाऱ्या मंगळवारी बाजार, सदर येथील जाईबाई चौधरी ज्ञानपीठात शिकणाºया संजनाची ही यशोगाथा थक्क करणारीच आहे. परिस्थिती वाईट असली की स्वप्न कोमेजली जातात. तिला मात्र स्वप्न टवटवीत ठेवायचे होते. गरीब व सामान्य घरातील मुलांप्रमाणे करिअरबाबतचा संभ्रम तिच्याही मनात होता. दहावीत चांगले गुण मिळाल्यानंतर काय करावे, हा प्रश्न तिच्यासमोरही होताच. कुठले ध्येय बाळगावे, असे सांगणारा मार्गदर्शकही नव्हता. तिने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. एक गोष्ट तिने कटाक्षाने पाळली, ती म्हणजे अभ्यासासाठी अपार कष्ट घेण्याची तयारी. काय करायचे हा विचार करीत बसण्यापेक्षा जे करीत आहोत त्यात मनापासून मेहनत घ्यावी, हेच तिला ठाउक. मिळेल तेव्हा आणि जमेल तसे दररोज पाच ते सहा तास अभ्यास करण्याचे वेळापत्रकच तिने बनविले. बारावीच्या परीक्षेत या मेहनतीचे फळही तिला मिळाले.आपल्याला यश मिळेल हा विश्वास होता. यामध्ये मामा आणि मामीने आर्थिक आणि मानसिक आधार दिल्याचे संजनाने लोकमतशी बोलताना सांगितले. त्यांच्यामुळेच आधी नसलेले जीवनाचे ध्येय आता स्पष्ट दिसायला लागल्याची भावना तिने व्यक्त केली. शाळेच्या शिक्षकांनी केलेल्या सहकार्याचे आभार मानायलाही ती विसरली नाही.

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८