शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला

By नरेश डोंगरे | Updated: April 23, 2025 05:27 IST

जरीपटक्यातील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणारे रुपचंदानी कुटंबीय व्यापारी असून, गांधीबागमध्ये त्यांचे प्लास्टिकचे दुकान आहे.

नरेश डोंगरे  नागपूर : पहलगाम हल्ल्याचे वेळी घटनास्थळी असलेले नागपुरातील रुपचंदानी कुटुंबीय सुखरूप आहे. मात्र, हल्ला झाल्याचे माहिती पडल्यापासून तो त्यांच्याशी संपर्क होईपर्यंतच्या दोन-तीन तासापर्यंत रुपचंदानी यांच्या नातेवाईकांचा जीव अक्षरश: टांगणीला लागला  होता. अखेर त्यांच्याशी संपर्क झाला अन् आम्ही सुखरूप आहोत... तुम्ही काळजी करू नका, असे सांगून पहलगाम हल्ल्याचे साक्षीदार ठरलेल्या नागपूरकर रुपचंदानी कुटुंबीयांनी त्यांच्या येथील नातेवाईकांना आश्वस्त केले.

जरीपटक्यातील हाऊसिंग बोर्ड कॉलनीत राहणारे रुपचंदानी कुटंबीय व्यापारी असून, गांधीबागमध्ये त्यांचे प्लास्टिकचे दुकान आहे. येथून ते १४ एप्रिलला दोन आठवड्याच्या काश्मिर टूरवर गेले होते. २७ एप्रिलला ते नागपुरात परत येणार होते. मात्र, आज पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केल्यानंतर त्यात रुपचंदानी परिवारसुद्धा जखमी झाल्याचे वृत्त नागपुरात आले आणि जरीपटका सिंधी कॉलनीत भितीचे वातावरण निर्माण झाले. येथून त्यांच्या नातेवाईकांनी हालचाल जाणून घेण्यासाठी संपर्क करणे सुरू केले. मात्र, बराच वेळपर्यंत त्यांच्याशी संपर्कच होत नव्हता. त्यामुळे नातेवाईकांमध्ये रडारड सुरू झाली.

दरम्यान, रात्री ९च्या दरम्यान अखेर सिमरन रुपचंदानी यांच्याशी संपर्कही झाला. हल्ल्यानंतर निर्मांण झालेल्या धावपळीत पायाला दुखापत झाली. दुसरे काहीही नाही आम्ही तिघेही सुखरूप आहोत, असे सिमरनने त्यांच्या स्थानिक नातेवाईकांना सांगितले. त्यानंतर आमचा जीव भांड्यात पडल्याची प्रतिक्रिया सिमरन यांचे नातेवाईक उमेश रुपचंदानी यांनी लोकमत प्रतिनिधीशी बोलताना दिली. यासंबंधाने अधिक बोलणे झाले नाही. त्यामुळे आम्हाला फारसे काही सांगता येणार नसल्याचे उमेश यांनी सांगितले.

टॅग्स :nagpurनागपूरTerror Attackदहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला