ई-रिक्षा (प्रवासी वाहन) व ई-कार्ट (मालवाहू वाहन) यांना मोटर वाहन कायदा व नियम लागू करून त्यांची एक महिन्यात नोंदणी करण्यात यावी, असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला दिला. ...
अल्पवयीन मुलामुलींना वेगवान वाहने चालविण्यापासून कसे थांबवाल? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य शासनाला विचारला व विशेष उप-समितीच्या बैठकीत यावर विचारमंथन करून उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. ...
वाढता मानव-वन्यजीव संघर्ष रोेखण्याकरिता आखण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांतर्गत विदर्भात विशेषज्ञांनी सज्ज असे किमान १० शीघ्र बचाव दले स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या दलांसाठी ‘स्पेशलिस्ट’ तयार करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ...
मौदा तालुक्यातील वडोदा येथील पेट्रोलपंपवर सहा तरुणांनी दरोडा टाकून २७,४०० रुपये पळविले. दरोडेखोरांनी पेट्रोलपंपावरील तिघांना जबर मारहाणही केली. ही घटना मंगळवारी (दि. २२) मध्यरात्रीनंतर २.४० वाजताच्या सुमारास घडली. ...
एका प्रकरणाच्या चौकशीसाठी गेलेल्या परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी तथा कळमेश्वरचे ठाणेदार विशाल ढुमे यांना आरोपींनी पळण्याच्या प्रयत्नात धक्का दिला. त्यात ते किरकोळ जखमी झाले. ...
सकाळ व संध्याकाळच्या वेळेत नागपूर महानगरपालिकेने सार्वजनिक पार्कमध्ये संगीत व जाहिराती ऐकविण्याच्या सुरु केलेल्या उपक्रमावर नागरिक संतप्त झाले आहेत. ...
सात वर्षांपासून सतत मारहाण करीत एका महिलेवर (वय २४) बलात्कार करणाऱ्या सनी गजभिये (वय ३०, रा. भांडेवाडी) नामक आरोपीविरुद्ध सक्करदरा पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. ...
दुचाकीत पेट्रोल भरण्याच्या वादातून जरीपटक्यातील दोन गटात जोरदार वाद झाला. दोन्हीकडून एकमेकांच्या घरावर हल्ला चढवून मारहाण, तोडफोड करून जाळपोळ करण्यात आली. सोमवारी मध्यरात्रीपासून जरीपटक्यातील गौतमनगरात सुरू झालेला हा घटनाक्रम मंगळवारी सकाळी १० वाजेपर ...