केंद्रात घटनात्मक आरक्षणानुसार ओबीसी समाजाला २७ टक्के, एससी समाजाला १६ टक्के तर एसटी समाजाला ७.६ टक्के आरक्षण आहे. परंतु आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेसाठी (एम्स) काढलेल्या ५२ पदांच्या जाहिरातीत या आरक्ष ...
‘अच्छे दिन’चे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकारच्या कार्यकाळात पेट्रोलचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. अनेक दिवसांपासून पेट्रोलचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे वाहनचालक हवालदिल झाले असून कर स्वरुपातील छुपा आर्थिक बोझा त्यांच्यावर पडत आहे. अखेर ‘अच्छे दिन’ केव ...
अवैध सावकार आणि त्याच्या साथीदाराने ६५ हजारांच्या वसुलीसाठी कर्जदारामागे सारखा तगादा लावला. त्याला वारंवार अपमानित करून धमकी देऊ लागला. त्याच्या धमक्यामुळे प्रचंड दडपण आल्यामुळे जुगराम बळीराम लांजेवार (वय ४८) यांनी गळफास लावून आत्महत्या केली. ...
गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाºया मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणातील सहा आरोपींच्या जामीन अर्जांवर येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत निर्णय देण्याचा आदेश मुंबई उच्च न्याया ...
राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे. ...
बुटीबोरी परिसरातील अपघातात जखमी झालेल्या कामगारावर उपचारास नऊ तास उशीर झाल्यामुळे तो दगावला. या घटनेने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून औद्योगिक परिसरात ईएसआयसीचे हॉस्पिटल असावे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’ने बाजी मारली आहे. १० पैकी ६ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले आहेत. ...