राज्यामध्ये कायद्यांची पायमल्ली करून कत्तलखाने सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालय व राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणच्या पुणे खंडपीठाने कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही केराची टोपली दाखवल्या गेली आहे. ...
बुटीबोरी परिसरातील अपघातात जखमी झालेल्या कामगारावर उपचारास नऊ तास उशीर झाल्यामुळे तो दगावला. या घटनेने कामगारांमध्ये संतापाचे वातावरण असून औद्योगिक परिसरात ईएसआयसीचे हॉस्पिटल असावे, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विधिसभेतील पदवीधर गटाच्या निवडणुकांमध्ये ‘शिक्षण मंच-अभाविप’ने बाजी मारली आहे. १० पैकी ६ जागांवर ‘शिक्षण मंच-अभाविप’चे उमेदवार विजयी झाले आहेत. ...
प्रतिमा उजाळण्यासाठी प्रभागातील फलकावरील माजी नगरसेवकांची नावे पुसून आपल्या नावाच्या पाट्या लावण्याचा खटाटोप सुरू केला आहे. अपयश लपविण्यासाठी हा उपद्व्याप सुरू असल्याने यातून प्रभागातील शांतता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
अवैध वसुलीच्या विरोधात सुपारी व्यापाऱ्यांनी बुधवारी कळमन्यातील कारखाने बंद ठेवले आणि मस्कासाथ येथे निदर्शने केली. सुपारी व्यापाऱ्यांनी या परिसरातील दुकाने बळजबरीने बंद केल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. ...
प्लास्टिकची बॉटल आणि झाकण तयार करण्याची मशीन लावून दर महिन्यात लाखो रुपयांचा व्यवहार होत असल्याची बतावणी करून एक युवक ४८ लाख रुपये घेऊन फरार झाला. या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...