बेदरकारणपणे वाहन चालवून अपघात घडवून आणणाऱ्यांना आवरण्यासाठी स्पीडगनचा वापर करण्यात येईल. शहराला अपघातमुक्त शहर बनविण्याचे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त एस. चैतन्य यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
गेल्या २२ वर्षापासून अतिक्रमण हटावे यासाठी संघर्ष करीत आहे. सुरुवातीला मुले लहान होती. आता मोठी झाली आहे. न्यायासाठी भटकंती करून थकलो आहे. परंतु न्याय मिळेल अशी आशा आहे. महापालिकेत गरिबाला न्याय मिळत नाही. अशी व्यथा मन्सूर इब्राहीम यांनी मांडली. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार गुप्ता यांच्या संकल्पनेतून बुलंद आर्ट गॅलरी साकारण्यात आली असून ही गॅलरी प्रवाशांना पाहण्यासाठी नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
भूसंपादनविषयीच्या वादाची प्रकरणे ऐकून निर्णय देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायदा-१९३६ मधील कलम ६० अंतर्गत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात आली आहे. ...
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. ...
२००१ पासून राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये ‘फॅको’ उपकरणाद्वारे बिनटाक्याच्या मोतीबिंदू शस्त्रक्रियेला सुरुवात झाली, परंतु शासनाकडून घडी करता येणारे भिंग (फोल्डेबल लेन्स) उपलब्ध करून दिले जात नाही. ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागात ‘प्लेसमेन्ट सेल’ची स्थापना करण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम यांनी दिली. ...
माजी मंत्री व काँग्रेस नेते रणजीत देशमुख यांनी आयडीबीआय बँकेचे ५ कोटी ७० लाख रुपयांचे थकित कर्ज अद्याप भरलेले नाही. त्यामुळे आता त्यांची संपत्ती जप्त करण्याची तयारी बँकेने केली आहे. ...