गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. ...
राष्ट्रीय महामार्ग विकास संस्थेतर्फे महाराष्ट्रात १०० नद्या व नाल्यांवर ‘ब्रिज कम बंधारे’ म्हणजे एकाच जागेवर पूल व बंधारे बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलसंपदा मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे दिली. ...
नागपूर-अमरावती महामार्गावर एका कंटेनरला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या आर्टिका कारने धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीररित्या जखमी झाला आहे. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास झाला. ...
मानवासाठी आवश्यक मुलभूत अन्नतत्वे मोठ्याप्रमाणात उत्पादित करणाऱ्या नवीन वाणांचा विकास करण्यासाठी गोंदिया जिल्ह्यात राज्यातील पहिला राईस पार्क सुरू करण्यात येईल. ...
केंद्र आणि राज्याच्या योजना शेवटच्या लोकांपर्यंत पोहचवून गावाचा विकास करणारा सरपंच हा दुवा असलेल्या व गावातील शेवटच्या व्यक्तीसाठी काम करून गावाचा सर्वांगीण विकास करणाऱ्या सरपंचाना लोकमतने नागपुरात एका दिमाखदार सोहळ्यात हृद्य गौरवान्वित केले. ...
शहरातील ‘कुख्यात गुन्हेगारांसोबत स्रेहबंध’ असल्याचे चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे आरोपी सेल मध्ये कार्यरत असलेल्या ८ पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले. या कारवाईमुळे शहर पोलीस दलात भूकंपासारखे वातावरण निर्माण झाले आहे. ...
आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त ज्वेलरी डिझायनर नीरव मोदी याने पंजाब नॅशनल बँकेला (पीएनबी) ११३०० कोटींचा गंडा घातल्याचे काल उघडकीस आल्यानंतर आता प्रवर्तन निदेशालय (एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट) सध्या या प्रकरणाची चौकशी करीत आहे. ...
मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे (मसाप) देण्यात येणारा कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार ज्येष्ठ कवी डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादिनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. ...
कराचा (जीएसटी) भुर्दंड चुकविण्यासाठी एका व्यक्तीला दीड लाखांची लाच मागणारे अमरावती येथील केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाचे (नवीन केंद्रीय जीएसटी कार्यालय) उपायुक्त मुकुल विश्वास तेलगोटे यांना गुरुवारी रंगेहात पकडण्यात आले. ...