पोलीस दलात ठिकठिकाणी उल्लेखनीय कामगिरी बजावणारे पोलीस उपायुक्त रवींद्रसिंग परदेशी यांचा राज्यपाल के. विद्यासागर राव यांच्या हस्ते मानाचे पोलीस पदक देऊन गौरव करण्यात आला. गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राज्यातील १३७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा बुधवारी मुं ...
नागपुरातील पर्यटनस्थळांच्या यादीत अग्रणी असलेल्या महाराज बागेचे भूषण असलेल्या जाई वाघिणीचे गुरुवारी सकाळी दीर्घ आजाराने निधन झाले. ती गेल्या सहा महिन्यांपासून मूत्रपिंडाच्या विकाराने ग्रस्त होती. ...
योगेश पांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ निधीच्या आर्थिक व्यवस्थापनात मोठ्या प्रमाणात उणिवा असून अनेक बाबींमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ‘ कॅग ’तर्फे (कॉम्पट्रोलर अॅन्ड आॅडिटर जनरल आॅफ इंडिया) ठेवण् ...
निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे. ...
विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामात झालेल्या दिरंगाई व अनियमिततेमुळे गेल्या ३४ वर्षात या प्रकल्पाची किंमत तब्बल ५० पट वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत लक्ष्याच्या फक्त २० टक्के सिंचन क्षमता निर्माण झाली, असे ताशेरे नियंत्रक व महालेखा ...
राज्यातील स्वस्त धान्य व केरोसीन दुकानदार संघटनांनी १ एप्रिलपासून माल न भरण्याचा व वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रेशनिंग व्यवस्था ठप्प पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास राज्यात हाहाकार निर्माण होईल. अशी भीती माजी मंत्री अनिल ...
जेवणात विष घालून श्वान व वराहांना मारण्यात आल्याची घटना कळमना वस्तीत उघडकीस आली आहे. शांतिनगर येथे श्वानांना रॉडने मारहाण करून त्यांचा जीव घेण्यात आल्याची घटना तीन दिवसांपूर्वीच घडली. या घटनांमुळे नागरिक आणि पशुप्रेमींमध्ये असंतोष पसरला आहे. ...
कोरेगाव भीमा दंगल घडवणाऱ्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी करून संभाजी भिडे यांना समर्थन देण्यासाठी श्री शिवराज्याभिषेकच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी नागपूर येथील महाल परिसरातील शिवाजी पुतळ्याजवळ मोर्चा काढला. ...
खामला येथील सहनिबंधक कार्यालयाला बुधवारी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत कार्यालयातील दस्ताऐवज व संगणक जळून खाक झाले. तीन तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. ...