जिल्हा परिषदेच्या २२५५ शिक्षकांच्या बदल्या आॅनलाईन करण्यात आल्या. परंतु या बदल्यांमध्ये प्रचंड घोळ झाल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. बदल्यांमध्ये झालेल्या अन्यायाबाबत शिक्षकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्या आहेत. ...
गेल्या वर्षी कापसाच्या पिकावर बोंडअळीचा झालेला परिणाम लक्षात घेता, यंदा कृषी विभागाने केलेल्या नियोजनात कापसाच्या क्षेत्रात घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. ही घट किमान २ हजार हेक्टरपर्यंत असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. कृषी विभागाने जिल्ह्यासाठी ५ ...
वृद्ध घरमालकाने भाडेकरूच्या चिमुकलीवर (वय ८ वर्षे) अत्याचार केला. पाप उघडकीस येऊ नये म्हणून त्याने तिला जीवे मारण्याचीही धमकी दिली. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १८ मे च्या मध्यरात्री ही घटना घडली. रतन दोडगूजी नागदेवे (वय ६०) असे आरोपीचे नाव असून, शुक ...
ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झा ...
भाजपा मजबूत झाल्यामुळे कमजोर असलेले सर्व विरोधक एकत्र येत आहेत. एकमेकांकडे न पाहणारे आता हातात हात उंचावत आहे. भाजपाने त्यांच्यात प्रेम निर्माण केले आहे. हे पोटनिवडणुकीत एकत्र आले असले तरी मुख्य निवडणुकीत तिकीट वाटपावरून यांचा पोळा फुटेल, असा नेम कें ...
शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी, शनिवारी वर्धालगतच्या रोठा येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून रास्ता रोको केला. शिवाय रस्त्यावर काही प्रमाणात भाजीपाला टाकून शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. ...
भारत ग्रोथ इंजिन झाला आहे अशा शब्दात देशातील विकासाची घोडदौड व्यक्त करताना रस्ते वाहतूक आणि महामार्ग, जहाज बांधणी आणि जलस्रोत, नदी विकास आणि गंगा शुद्धीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विकासाचा परामर्श घेतला. ...
शहरातील दोन युवा प्रतिभावान खेळाडू आपापल्या खेळात यशोशिखर गाठण्याचे ध्येय बाळगून आहेत. १२ वर्षांचा रौनक साधवानी बुद्धिबळात आंतरराष्ट्रीय मास्टर बनला तर १७ वर्षीय मालविकाने आशियाई शालेय बॅडमिंटन स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळविले. ...
आजारी वृद्धेच्या असहायतेचा गैरफायदा उचलून त्यांचा कागदपत्रावर अंगठा घेतल्यानंतर भागीदाराने कोट्यवधीच्या जमिनीला हडपण्याचे प्रयत्न चालविल्याची तक्रार संबंधित दिवंगत वृद्धेच्या मुलाने पोलिसांकडे केली आहे. ...
जानकीनगरातील न्यू इरा इंग्लिश स्कूलचे संचालक रमेश तळेकर यांना माहेश्वरीची परिस्थिती समजली अन् त्यांनी तिला मदत करण्याचे ठरविले. तिच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलल्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेण्याचे माहेश्वरीचे स्वप्न पूर्ण झाले. ...