वीज ग्राहकांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असणाऱ्या महावितरणने आता भीम अॅप आणि डेबिट कार्र्डद्वारे वीज बिलाचा भरणा करणाऱ्या ग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. ...
नोकरीचे आमिष दाखवून सायबर टोळीने एका तरुणाच्या खात्यातून एक लाख रुपये आॅनलाईन ट्रान्सफर करून घेतले. तहसील पोलीस ठाण्यात याप्रकरणी रविवारी बनवाबनवीचा गुन्हा दाखल झाला. ...
नवीन शिक्षक नियुक्तीवरील बंदीविरुद्ध गोंदिया शिक्षण संस्थेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. ही बंदी अवैध असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. संजय रायमूलकर (शिवसेना) यांना अनुसूचित जाती प्रवर्गातील बलई जातीचे वैधता प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
मरारटोलीतील रहिवासी प्रणय कावते याच्या हत्येनंतर रविवारी रात्री त्याच्या समर्थकांनी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी आज सकाळपासूनच परिसरात कडक बंदोबस्त लावला होता. या हत्याकांडामुळे परिसरात पुन्हा एकदा गँग ...
भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली. ...
दक्षिण-पश्चिम मतदारसंघासाठी येत्या २८ व २९ एप्रिल रोजी हैद्र्राबाद हाऊस येथील परिसरात समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सोमवारपासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. ...
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनील सिंह सोईन यांनी कळमना-गोधनी नव्या लाईनचे निरीक्षण केले. त्यानंतर आयोजित समीक्षा बैठकीत विभागात सुरू असलेली ब्रॉडगेजची कामे ठरविलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी दिले. ...
शहरात सोमवारी सायंकाळी अचानक वातावरणात बदल झाला. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. किमान अर्धा तास तरी पाऊस सातत्याने झाल्याने वातावरण आल्हाददायक झाले. गेल्या दोन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात पाऊस बरसतो आहे. ...