लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पूर्व नागपुरातील वर्धमाननगरात कोळसा व्यापारी आणि त्याच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करून ७० लाख रुपये लुटल्याची घटना शुक्रवारी रात्री ८.१५ वाजता घडली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.तीन दिवसांपूर्वी गँगस्टर ...
दिल्लीवरून चेन्नईला जाणाऱ्या जीटी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये शुक्रवारी दुपारी बिघाड झाला. यामुळे ही गाडी एक ते दीड तास गुमगावजवळ अडकून पडल्याने गाडीतील प्रवाशांची गैरसोय झाली. त्यानंतर या गाडीला नवे इंजिन लावून ती चेन्नईसाठी रवाना करण्यात आली. ...
जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत एक तरुणी व विवाहितेवर अत्याचाराची घटना उघडकीस आली आहे. पहिल्या घटनेत तडीपार गुंडाने तरुणीचे अपहरण करून तिच्यावर पाच दिवस अत्याचार केला. दुसऱ्या घटनेत ओळखीचाच युवक नऊ महिन्यापासून अत्याचार करीत होता. अत्याचाराची व्हिडिओ क्लीप ...
नंदनवनमधील पवनकर हत्याकांडातील क्रूरकर्मा आरोपीच्या आईने शुक्रवारी (दि. २९) नैराश्य आणि भीतीमुळे विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत तिला वाचविले. हा धक्कादायक प्रकार अरोली (ता. मौदा) पोलीस ठाण्याच्या ...
मागून वेगात येणाऱ्या ट्रकने कट मारला आणि चालकाचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी नालीत शिरली व दुचाकीवरील तिघेही नालीलगतच्या भिंतीवर आदळले. त्यात आई व मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले. ही घटना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या ...
हरणांचा कळप रोड पार करीत असतानाच भरधाव वेगात असलेला अवैध रेतीवाहतुकीचा ट्रक कळपात शिरला. त्यात चार हरणांचा चिरडून मृत्यू झाला तर एक हरीण गंभीर जखमी झाले. ही घटना देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवराबाजार-सालई मार्गावर शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या ...
कारने जात असलेल्या गोंडेगाव (ता. पारशिवनी) येथील उपसरपंचाला कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-जबलपूर महामार्गावरील टेकाडी शिवारात अडवून त्याचा तलवारीने वार करीत खून करण्यात आला. हा खून कोळसा चोरी आणि अवैध धंद्यातून झाला असण्याची शक्यता व्यक्त क ...
झोन चारचे डीसीपी नीलेश भरणे यांनी गुरुवारी रात्री उमरेड रोडवर रेती आणि गिट्टीची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध व्यापक मोहीम चालवित तासाभरात ३६ टिप्पर पकडले. या करवाईमुळे वाळू आणि खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. ...
वाशीम व मालेगाव येथील केंद्रांद्वारे करण्यात आलेल्या धान्य खरेदीची संपूर्ण रक्कम दोन आठवड्यांत न्यायालयात जमा करण्यात यावी असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी पणन महासंघाला दिला. ...
वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक कधी घेता अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारला केली आहे. तसेच, सहकार विभागाचे सचिव, सहकार आयुक्त व अन्य प्रतिवादींना नोटीस बजावून यावर १७ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचा आदेश द ...