अप्रमाणित आयुर्वेदिक औषधांचे बेकायदेशीरीत्या रिपॅकिंग व रिलेबलिंग करून रुग्णांना विक्री करणाऱ्यांवर अन्न व औषध प्रशासन विभागाने धाडी टाकून विश्लेषण अहवालाच्या आधारे जरीपटका आणि प्रतापनगर ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. ...
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून आतापर्यंत विदर्भातील ७८८ सिंचन प्रकल्प पूर्ण केल्याची माहिती दिली. तसेच, ३१४ सिंचन प्रकल्पांचे काम सुरू असून, त्यापैकी १३४ सिंचन प्रकल्पांचे का ...
महानगरपालिकेने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करून सार्वजनिक रोडवरचे केवळ एकच अनधिकृत धार्मिकस्थळ वाचले असल्याची माहिती दिली. ...
महाल भागातील केळीबाग रोडच्या रुंदीकरणासाठी महापालिकेला १३७ कोटी ४१ लाखांची गरज आहे. यातील १२२ कोटी १४ लाख जमीन अधिग्रहण, जलवाहिनी व विद्युतवाहिनी दुसरीकडे स्थानांतरित करण्यावर खर्च होतील, तर बांधकामावर १५ कोटी २७ लाखांचा खर्च केला जाणार आहे. ...
संपूर्ण राज्यात पालकमंत्री पांदण योजना प्रभावीपणे राबविण्याच्या दृष्टीने व या योजनेतील कामे अधिक गतीने होण्यासाठी शासन निर्णयात काही सुधारणा सुचविण्यासाठी बुधवारी रोहयोमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक मुंबई येथे मंत्रालयातील त्यां ...
रेल्वे सुरक्षा दलाने सलग १९ व्या दिवशी मादक पदार्थांची तस्करी करणाऱ्या आरोपींविरुद्ध कारवाई करीत दक्षिण एक्स्प्रेसमधून दारू, गुटख्याची तस्करी पकडली. ...
मानस चौकात बुधवारी दुपारी ४ च्या सुमारास प्रवाशांनी भरलेल्या धावत्या बसच्या इंजिनमध्ये शॉट सर्किटमुळे अचानक आग लागली. काही क्षणातच आग वाढायला लागली. चालकाने खबरदारी म्हणून बस थांबवून प्रवाशांना बसमधून खाली उतरवले. पोलिसांच्या मदतीने अग्निशमन विभागाला ...
नागपुरातील अनेक पॉश हॉटेलमध्ये देहव्यापाराचा अड्डा चालत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. रामदासपेठ, सदर आणि वर्धा रोडवरील या हॉटेलमध्ये चालत असलेला देहव्यापार आता हाय प्रोफाईल बनला आहे. शहर पोलिसांनाही हा सर्व प्रकार माहीत आहे, परंतु काय कार ...