मोकाट कुत्र्यांनी महेंद्रनगरात एका तरुणाचा बळी घेतला. दुचाकीमागे धावणा-या कुत्र्यापासून स्वत:ला वाचविण्याच्या प्रयत्नात त्याची दुचाकी विजेच्या खांबाला धडकली. त्यामुळे कुणाल कृष्णाजी अडकिने (वय २३, रा. बाळूनगर, बिनाकी लेआऊट) या तरुणाचा मृत्यू झाला. ...
जेवणाचे पार्सल घेऊन निघालेल्या एका वाहनचालकाला अज्ञात वाहनचालकाने जोरदार धडक मारल्याने त्याचा करुण अंत झाला. शुक्रवारी रात्री १० ते १०.३० च्या सुमारास नरेंद्रनगर पुलाजवळच्या कंटेनर डेपोजवळ हा भीषण अपघात घडला. ...
शाळेच्या प्रांगणात जाऊन एका मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीवर शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र, तो मोटरसायकलवर बसून सुसाट वेगाने पळून गेला. शुक्रवारी सायंकाळी गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे परिसरात संतप्त वाताव ...
खाद्यान्नात भेसळ आणि भेसळयुक्त खाद्यान्न विक्री करताना दोषी आढळल्यास आजीवन कारावासाची तरतूद राज्य शासनाने काढलेल्या अध्यादेशात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...
भारतातील एकूण १२ राज्यात सिकलसेल आढळतो. महाराष्ट्रातील सुमारे १९ जिल्हे सिकलसेलने प्रभावित आहेत. विदर्भात याचे सुमारे १.२७ लाख रुग्ण तर २५ लाख वाहक आहेत. ...
लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेतील विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या पत्रकारांचा गौरव करण्यासाठी १९८८ साली लोकमतने सुरू केलेल्या पत्रकारिता पुरस्कार स्पर्धेला यंदा २८ वर्षे पूर्ण होत आहेत. ...
अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्यामुळे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. लक्ष्मणसिंग राठोड व उप-महासंचालक डॉ. पी. के. ...
ऊर्जेची बचत ही ऊर्जेची निर्मिती असून प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कामाच्या दरम्यान ऊर्जेची बचत करावी, असे आवाहन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक मनिंदर सिंह उप्पल यांनी केले. ...