राजीवन यांच्याविरुद्धची अवमानना कारवाई रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 04:27 AM2018-12-15T04:27:45+5:302018-12-15T04:27:56+5:30

अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्यामुळे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. लक्ष्मणसिंग राठोड व उप-महासंचालक डॉ. पी. के. नंदनकर यांच्याविरुद्धची अवमानना करवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. त्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला.

Contempt of contempt proceedings against Rajiv Gandhi | राजीवन यांच्याविरुद्धची अवमानना कारवाई रद्द

राजीवन यांच्याविरुद्धची अवमानना कारवाई रद्द

Next

नागपूर : अनुसूचित जमातीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आल्यामुळे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. माधवन नायर राजीवन, हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक डॉ. लक्ष्मणसिंग राठोड व उप-महासंचालक डॉ. पी. के. नंदनकर यांच्याविरुद्धची अवमानना करवाई मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केली. त्यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला.

न्यायमूर्ती रवी देशपांडे व विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. दि ऑर्गनायझेशन फॉर दि राईटस् ऑफ दि ट्रायबल्सने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून नागपूर येथे मुख्यालय असलेल्या प्रादेशिक हवामान विभागातीलअनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव नोकºया मिळविणाºया कर्मचाºयांची जात प्रमाणपत्रे पडताळण्यात यावीत व बोगस जात प्रमाणपत्रे सादर करणाºया कर्मचाºयांना बडतर्फ करण्यात यावे, अशी विनंती केली होती. दरम्यान, हवामान विभागाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून अशा सर्व कर्मचाºयांची जात प्रमाणपत्रे पडताळली जातील अशी ग्वाही दिली होती. त्यामुळे ४ आॅगस्ट २०१६ रोजी न्यायालयाने ते प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन याचिका निकाली काढली होती. त्यानंतर हवामान विभागाने संबंधित कर्मचाºयांची जात पडताळणी केली नाही, असा आरोप करून संघटनेने वरील तीन अधिकाºयांविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली. हायकोर्टाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर संबंधित कर्मचाºयांवर कायद्यानुसार कारवाई केली.

Web Title: Contempt of contempt proceedings against Rajiv Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर