शहरातील प्रसिद्ध गांधीसागर तलावाच्या सौंदर्याला अतिक्रमणाचा डाग लागला आहे. तलाव परिसरातील फूटपाथवर पान, चहा, नाश्त्याच्या टपऱ्यांनी कब्जा केला आहे. ...
नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(एनएमआरडीए) तर्फे शहरातील विविध भागात ४७९३ घरकुल निर्मितीचे प्रकल्प सुरू आहेत. मात्र यातील ३३४५ घरकुलांचे बांधकाम डिसेंबरपर्यंत होईल. ...
शहरातील तज्ज्ञ सर्जन भगवाघर ले-आऊट येथील रहिवासी डॉ. अरविंद महादेव जोगळेकर यांचे बुधवारी राजस्थानमधील भरतपूर येथे निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी अंत्यसंस्कार करण्यात येईल. ...
वर्धा रोडवर हॉटेल रेडिसन ब्ल्यूजवळ एका ट्रॅव्हल्स बसला अपघात झाला. या बसमध्ये जवळपास ४० प्रवासी असल्याची माहिती आहे. यात १० ते १२ प्रवासी जखमी झाले. जखमींना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा अपघात बुधवारी सकाळी घडला. ...
गोरेवाडा प्राणिसंग्रहालयाच्या युनिट -१ परिसराला बुधवारी सायंकाळच्या सुमारास आग लागली. मात्र, त्यावर त्वरित नियंत्रण मिळविण्यात प्रशासनाला यश आल्याने अनर्थ टळला. ...
शांतिनगर येथे प्रवीण ऊर्फ शशी गायधने याची मारहाण करून हत्या करणारा गुन्हेगार आणि त्याच्या कुटुंबीयांना संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करीत बुधवारी रात्री संतप्त नागरिकांनी शांतिनगर पोलीस ठाण्याला घेराव घातला. ...
आंतरिक फेरबदलांतर्गत बुधवारी शहर पोलिसातील ठाणेदारांसह ११ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी रात्री यासंबंधीचे आदेश जारी केले. ...
अडीच कोटी रुपयाची बोगस बँक गॅरंटी देऊन एका शासकीय कंत्राटदाराची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी कोलकातातील शकुंतला पार्क येथील आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर सगनिंग रॉय यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...