हजयात्रा १८ जुलैला सुरू होत आहे. नागपूर, विदर्भासह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील हज यात्रेकरू आणि त्यांच्या सोबत अनेकजण भालदारपुरा येथील हज हाऊसमध्ये पोहोचतील. सकाळपासून रात्रीपर्यंत हज हाऊसमध्ये नागरिकांची गर्दी राहते. परंतु हज हाऊसची फायर सिस्टीम पूर ...
उघड्यावर व घाणीत तयार करण्यात येत असेलल्या पाणीपुरीसह निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने शनिवारी उघडकीस आणताच खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) वृत्ताची दखल घेत इतवारी नंगा पुतळा परिसरातील पाणीपुरीसह खाद्यपदार्थांचे ...
केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात सर्व क्षेत्राला काही ना काही देताना घोषणांचा पाऊस पाडला. या घोषणा प्रत्यक्षात अमलात आणल्याशिवाय शासनाला ८ टक्के जीडीपीचे लक्ष्य गाठता येणार नाही. सरकारने पहिल्यांदाच छोटे व्यावसायिक आणि लघु व म ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी या गावाचा पूर्णत: कायापालट झाला आहे. फेटरी गावाने कात टाकली असून आज हे गाव सार्वजनिक वाचनालय, अत्याधुनिक शाळा, पशुवैद्यकीय दवाखाना, अंगणवाडी, स्मशानभूमी, ग्राम पंचायतची नवीन सुसज्ज इमारत आदींसह ...
रात्रीच्या वेळी किराणा दुकानावर कब्जा करून भल्या सकाळी दुकानदारावर चाकूहल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका गुंडाला परिसरातील नागरिकांनी संघटितपणे प्रत्युत्तर दिले. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी धाव घेतल्यामुळे हातात चाकू घेऊन दहशत पसरविणारा गुंड सुसाट ...
नवोदय बँकेचे अध्यक्ष अशोक धवड यांच्यासह अनेक संचालकांच्या घरी गुन्हे शाखेच्या आर्थिक विभागातील पथकाने छापा मारला. त्यांच्याकडून दोन आलिशान कार जप्त केल्या. या कारवाईमुळे संबंधित वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ...
भंडारा येथे सहायक कामगार आयुक्त कार्यालयातर्फे आयोजित बांधकाम कामगारांना किट वाटप शिबिरात नागपुरातील अप्पर कामगार आयुक्त कार्यालयातील कनिष्ठ कामगार अन्वेषक रवींद्र यावलकर गेले होते. त्यांना शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मारहाण करून कार्य ...
बसने प्रवासाला निघाल्यावर प्रत्येकाला कंडक्टर वाजवितो त्या घंटीचा आवाज ऐकू येतो. वाहकाने वाजविलेल्या घंटीतील कोडच्या आधारावर चालक आपल्याला पुढे जायचे की काय याचा निर्णय घेतो. बसमध्ये असामाजिक तत्त्व वाद घालत असतील तर वाहक चालकाला काहीच न बोलता घंटीने ...