नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करणाऱ्या आरोपीला विशेष सत्र न्यायालयाने मंगळवारी १२ वर्षे सश्रम कारावास व ८००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ८० दिवस अतिरिक्त कारावास अशी कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश व्ही. जी. रघुवंशी ...
अंतर्गत वादामुळे अस्थिर झालेल्या विदर्भ हॉकी संघटनेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी धर्मादाय उपायुक्तांना दिला. ...
नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटनेसह एकूण १२ जिल्हा संघटनांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करून महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे सातारा येथे आयोजित राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्ध ...
महापालिका शहरातील नागनदी, पिवळी नदी व पोहरा नदीचे स्वच्छता अभियान ४ मे ते ५ जून दरम्यान राबविणार आहे, अशी माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी मंगळवारी मनपा मुख्यालयातील आयुक्त सभागृहात आयोजित नदी स्वच्छता अभियान आढावा बैठकीत दिली. ...
न्यायालयाच्या आदेशाची वस्तूस्थिती लक्षात न घेता स्वत:च्या व्टिटर अकाउंटवर दिशाभूल करणारा मजकुर अपलोड करण्याचा प्रकार नागपूर लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्या अंगलट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पटोलेंविरुद्ध नायब तहसीलदार ...
इंडिगो एअरलाईन्सची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी मुंबईसाठी नवीन उड्डाण सुरू केले आहे. फ्लाईट क्रमांक ६ ई ५३८९ हे दुपारी ३.३० वाजता नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यात मोठ्या संख्येने प्रवाशांनी प्रवास केला. ...
नागपूर रेल्वे स्थानकावरून सुटलेल्या मिलेनियम एक्स्प्रेसमध्ये रात्री उशिरा मुलताई आणि आमलादरम्यान प्रवाशांसोबत लुटमारीची घटना घडल्याची माहिती असून, आरोपी रेल्वे सुरक्षा दलाची नजर चकवून फरार होण्यात यशस्वी झाले. ...
महावितरणने ‘हीट अॅक्शन प्लँट’अंतर्गत सकाळी ११ वाजेनंतर ‘मेंटेनन्स’साठी वीज बंद केली जाणार नाही, अशी घोषणा केली. परंतु असे कुठले मेंटेनन्स आहे जे दर बुधवारी केल्यानंतरही पूर्ण होत नाही आणि हवामानात थोडाही बदल झाला तरी वीज वितरण यंत्रणा कोलमडून पडते? ...
भंडारा मार्गावरील कापसी महालगाव परिसरात असलेल्या स्वरूची मसालेच्या पाच मजली कोल्ड स्टोअरेजला सोमवारी दुपारी १.५० च्या सुमारास आग लागली. कोल्डस्टोअरेजमध्ये हजारो टन मिरचीचा साठा आहे. आगीमुळे मिरचीचा धूर आजूबाजूच्या परिसरात प ...