वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होत असल्याची अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस व सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी या तक्रारीद्वारे करण्यात आली आहे. ...
नागपूर शहरात चार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले, या चारही व्यक्ती धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या परिसरात राहणाऱ्या आहेत.या व्यक्ती विदेशातून आल्यानंतर त्यांच्या संपर्कात कोण कोण आलेत, याचा शोध घेतला जात आहे. ...
कोरोनाच्या रूपाने आलेले हे जीवघेणे संकट परतवून लावण्यासाठी दक्ष आणि सतर्क नागरिक म्हणून यावेळी तुम्ही घरीच बसा, असे भावनिक आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी लागू झालेल्या जमावबंदीच्या संबंधाने केले आहे. ...
संचारबंदीबाबत पोलीस आयुक्तांकडून रविवारी रात्रीच सूचनावजा आदेश निर्गमित करण्यात आले. मात्र, अनेकांनी खास करून उत्साही, उपद्रवी मंडळींनी विनाकारण इकडून तिकडे फिरत संचारबंदी झुगारण्याचा प्रयत्न केला. ...
कोरोनाचा फैलाव थांबविण्यासाठी एकही व्यक्ती घराबाहेर दिसायला नको. प्रत्येक व्यक्ती आपापल्या घरातच राहायला पाहिजे. तेव्हाच कोरोना नियंत्रणात येईल, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नोंदवले व यासंदर्भात आवश्यक उपाय करण्याचे ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आवश्यक ती काळजी व रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवारी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकींचे सत्र पार पडले. यादरम्यान मेडिकलमध्ये कोरोना विषाणूबाधित रुग्णांसाठी १०० खाटांचा अतिदक्षता कक्ष तयार करण्याचा निर् ...