वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे तरुण प्राध्यापिकेला जिवंत जाळणाऱ्या माथेफिरू विक्की ऊर्फ विकेश नगराळेला फासावर लटकवले हेच आपले अंतिम लक्ष्य राहील, अशी भूमिका अॅड. प्रशांत सत्यनाथन यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना मांडली. ...
जुना जेलखाना येथील हज हाऊसमध्ये विवाह तथा अन्य कार्यक्रमांच्या आयोजनासाठी आरक्षणाच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. ...
तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ...
जन्मत: बालकाच्या पोटात गर्भ वाढणे हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण. मात्र, नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एक नव्हे तर तब्बल तीन प्रकरणे आढळून आलीत. वैद्यकीय भाषेत याला ‘फिट्स इन फिटू’ म्हटले जाते. ...
आदिवासी क्षेत्रासाठी उपलब्ध निधी पूर्णपणे खर्च होईल, यादृष्टीने नियोजन करावे, असे आदेश राज्याचे आदिवासी विकास मंत्री अॅड. के. सी. पाडवी यांनी गुरुवारी येथे राज्यस्तरीय बैठकीत दिले. ...
तुम्ही घाबरू नका, पोलीस तुमच्या पाठीशी आहेत. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल, वेळ आणि स्थळ कोणतेही असू द्या. रात्री-बेरात्री तुम्ही कधीही फक्त एक फोन करा. तुम्हाला त्रास देणाऱ्यांना आम्ही धडा शिकवू. ...
युवतीच्या अंगावर पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्याची घटना अत्यंत संवेदनशील आहे. सरकारनेही गुन्हेगारांच्या मनात धाक निर्माण होईल, अशी तातडीने कारवाई करावी, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...
सिनेमामधूनच लोकांना अनेक मूल्यात्मक गोष्टी शिकायला मिळतात. त्यामुळे दुर्लक्षित गोष्टी सिनेमामधून हाताळण्याचा, मांडण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक व निर्माता मधुर भंडारकर यांनी व्यक्त केले. ...
जर्मनीच्या कार्ल्सरूह शहराचे महापौर डॉ. फ्रँक यांनी गुरुवारी एका उच्चपदस्थ प्रतिनिधी मंडळासोबत नागपूर मेट्रोने प्रवास केला. त्यांनी मेट्रो पुलावरून शहराचे सौंदर्य न्याहाळले. नागपूर मेट्रोचा विकास पाहून ते प्रभावित झाले. ...
पेशींचा अभ्यास केल्यास संबंधित रोगावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. कर्करोग व क्षयरोगाच्या प्रकरणांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरते, अशी माहिती एम्सच्या संचालक मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी दिली. ...