मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2020 12:07 AM2020-02-07T00:07:54+5:302020-02-07T00:13:35+5:30

तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांनी ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

Mundhe Impact: Roads open; Discipline to administer | मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

मुंढे इम्पॅक्ट :  रस्ते झाले मोकळे ; प्रशासनाला लागली शिस्त

Next
ठळक मुद्देकामचुकार अधिकारी व निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना दणका

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्तप्रिय आणि कर्तव्यनिष्ठ तुकाराम मुंढे यांनी २८ जानेवारीला महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. पहिल्या दिवसापासून कामाला सुरुवात केली. लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर फूटपाथ व रस्त्यांवरील फेरीवाला हटाव मोहीम हाती घेतली. ६२ बाजारातील चार हजारांहून अधिक भाजी विक्रेते व फेरीवाल्यांवर कारवाई करीत शहरातील रस्ते मोकळे केले. यामुळे रहदारी सुरळीत झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
महापालिकेची शहरात १२६ उद्याने आहेत. यातील १३ उद्यानांची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे आहे. तर ११३ उद्यानांची जबाबदारी खासगी कंत्राटदारांकडे आहे. परंतु अनेक उद्यानांची अवस्था बिकट आहे. उद्यानांची स्वच्छता व देखभाल व्यवस्थित होत नसल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाºयांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
जनता दरबारामुळे नागरिकांना दिलासा
अतिक्रमण, रस्ते, पाणीपुरवठा, सिवरेज, मोकाट कुत्रे, घरटॅक्स अशा स्वरुपाच्या नागरिकांच्या तक्रारी तातडीने मार्गी लागाव्यात. यासाठी तुकाराम मुंढे यांच्या नियमित जनता दरबाराला सुरुवात केली. यात दररोज ९० ते १०० तक्रारी वा समस्या येत आहेत. तक्रारींची तात्काळ सुनावणी केली जात आहे. तक्रारीसंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत तातडीने दखल घेण्यास सांगितले जात आहे. यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
बाजारातील अतिक्रमण हटविले
शहरात विविध भागात दररोज किंवा आठवडी बाजार भरतात. मात्र मनपाने निर्धारित केलेल्या परिसराव्यतिरिक्त रस्त्यावर भाजी विक्रेते व्यवसाय करतात. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. याशिवाय नागरिकांनाही अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. याची गांभीर्याने दखल घेत महापौर संदीप जोशी यांनी अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. आयुक्तांनी पदभार स्वीकारताचा फेब्रुवारीपासून कारवाईला धडाक्यात सुरुवात झाली. शहारातील ६२ बाजारावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण हटविल्याने रस्ते मोकळे झाले. वाहतुकीचा अडथळा दूर झाला. रस्ते व फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई सुरू आहे.

कंत्राटदार व अधिकाऱ्यांना दणका
पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंनी पहिल्याच दिवशी नागपूर मनपाच्या लेखा विभागातील चार कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर दुसºया दिवशी सिमेंट रोड कंत्राटदारांना आणि मनपाच्या अभियंत्यालाही कारणे दाखवा नोटीस बजावली. एकस्तंभ चौक ते उत्तर अंबाझरी हा सिमेंट रस्ता जे.पी. इंटरप्रायजेस या कंपनीने तयार केला आहे. या रस्त्यांवरील आय ब्लॉक मानकाप्रमाणे नसल्याचा अहवाल प्रयोगशाळेने दिला आहे. क्युरिंग पिरियड पूर्ण होण्यापूर्वीच आय ब्लॉक लावण्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. निकृष्ट कामाबाबत आयुक्तांनी यांनी जे.पी. इंटरप्राईजेस क्वॉलिटी कंट्रोलचे काम पाहणारी क्रिएशन इंजिनिअर्स यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. 

गोकुळपेठ, बुधवाराला शिस्त
गोकुळपेठ व कॉटन मार्के ट येथील बाजार जुने आहेत. परंतु भाजी विक्रेते रस्त्यावर येऊन दुकाने लावतात. यामुळे रहदारीला अडथळा होत होता. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी होत्या. याची दखल घेत गोकुळपेठ व कॉटन मार्केटसह शहरातील आठवडी बाजारात अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करून शिस्त लावली. तसेच स्वच्छता राहावी यासाठी विक्रे त्यांना कचरापेटी ठेवणे बंधनकारक केले.

कर वसुलीसासाठी कठोर भूमिका
नागपूर शहरात ६ लाख १३ हजार मालमत्ता आहेत. यातील ३ लाख ३३ हजार ८७ मालमत्ताधारकांकडे ४५४ कोटींची थकबाकी आहे. मालमत्ता कर हा महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत असल्याने तुकाराम मुंढे यांनी थकबाकीदारांच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. थकीत कर भरा अन्यथा कारागृहात जाल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Web Title: Mundhe Impact: Roads open; Discipline to administer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.