कोरोनाच्या बिकट परिस्थितीत गरीब जनतेला अल्प मानधनावर रेशन पुरविण्याचे काम रेशन दुकानदार स्वत:चा जीव धोक्यात घालून करीत आहेत.रेशन दुकानदारांना संरक्षण न दिल्यास १ मेपासून रेशन दुकान बंद ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. ...
भाजी बाजारात येणाऱ्या जनसमुदायांमध्ये सुरक्षित अंतर राखण्याच्या दृष्टीने आणि ग्राहकांच्या सोयीसाठी कळमना येथील भाजी बाजार शनिवार, २५ एप्रिलापासून सुरू करण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकाने घेतला आहे. ...
नागपूरसह विदर्भात एकीकडे रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे तपासायला नमुने नसल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. गुरुवारी मेयोने दिवसा २०, मेडिकलने ४४ तर एम्सने ५८ नमुने तपासले आहेत. अशीच जर गती राहिली तर कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखणार, असा प् ...
राज्यात पुणे, मुंबईनंतर विदर्भातही रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी यवतमाळ जिल्ह्यात एकाच दिवशी नऊ रुग्ण पॉझिटिव्ह आले. या जिल्ह्यात आतापर्यंत २७ रुग्णांची नोंद झाली असून विदर्भात ही संख्या १७२ वर पोहचली आहे. ...
पिपळा रोडजवळील विठ्ठलनगर येथील आर.एस. लॉनजवळ दोन सांडांची झुंज सुरू होती. या झुंजीत दोन्ही सांड बाजूच्या खुल्या विहिरीत पडले. विहीर कमी व्यासाची व खोल असल्याने एका सांडाचा मृत्यू झाला. ...
कोरोनामुक्त होऊन गुरुवारी मेयो रुग्णालयातून घरी गेलेल्या ४४ व्यक्तीचे नमुने सलग चार वेळा पॉझिटिव्ह आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पहिल्यांदाच घडले. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी गावापासून ८०० किलोमीटर चिचोली (खापरखेडा) येथे रोजगाराच्या शोधात आलेल्या राहुल कुमारच्या पत्नीचा झारखंड येथील गावी २० एप्रिल रोजी मृत्यू झाला. पत्नीचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गावी जाण्याची परवानगी मिळविण्यासाठी राहुल कुमारची धडपड ...
कोरोनाचे रुग्ण सतत वाढत असतानाही राज्य सरकारने केंद्र सरकारला रॅपिड अॅण्टी बॉडी टेस्ट कीटची मागणी केली नाही ही धक्कादायक माहिती गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. ...
कोरोनाच्या संसगार्पासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी झालेले लॉकडाऊन काही अपवाद वगळता नागरिक पाळतही आहेत. या लॉकडाऊनचा परिणाम अनेकांच्या कामांवर झाला असून, रोज कमावेल तर रोज खाईल अशी अवस्था असणाऱ्यांची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. ...
राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी गुरुवारी दुपारी शहरातील कोरोनाबाधित हॉटस्पॉटला भेटी देऊन त्या परिसराबाबत अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या. त्यांनी मेयो हॉस्पीटल, सतरंजीपुरा, मोमिनपुरा आदी भागांना भेटी दिल्या. ...