कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाची खरेदी करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कापूस खरेदी तात्काळ सुरू करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज शनिवारी दिल्या. ...
‘लॉकडाऊन’ दरम्यान औद्योगिक कामे सुरू झाल्याने राज्यात विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक कंपन्या बंद असल्याने राज्यातील विजेची मागणी १३,६०० मेगावॅटच्या किमान स्तरावर पोहोचली होती. उन्हाळा वाढल्याने आणि काही उद्योग सुरू झाल्यामुळे विजेची मागणी १८, ...
बुटीबोरी वन परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या बुटीबोरी (पश्चिम) उपवन परिक्षेत्राच्या जुनापानी बीटामध्ये वन कर्मचाऱ्यांनी एका आरोपीला मांढूळ जातीच्या सापासह अटक केली. ...
पहिल्यांदाच नागपुरात एकाच दिवशी १९ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. एकट्या वानाडोंगरी अलगीकरण कक्षातील १७ रुग्ण आहेत. यात १० पुरुष तर सात महिलांचा समावेश आहे. तर उर्वरीत दोन आमदार निवास व वनामती येथील आहेत. या रुग्णांसह नागपुरात रुग्णांची संख्या १ ...
शुक्रवारी रात्री कळमन्यातील विजयनगर वस्तीतील एका गोदामात लपलेल्या काही लोकांना पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पकडून त्यांना आमदार निवासातील क्वॉरंटाइन सेंटरमध्ये पोहोचवले. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) ‘कोविड हॉस्पिटल’ हे राज्यात आदर्श म्हणून पाहिले जात आहे. अनेकांसांठी हे हॉस्पिटल मार्गदर्शक ठरेल, असे ट्विट स्वत: वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले. ...
सतरंजीपुऱ्यातून शनिवारी दुपारी ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये कॉल आला. ‘मी सतरंजीपुऱ्यातून बोलतोय.’, असे ऐकताच सर्वांनी कान टवकारले. मात्र एका पक्ष्याला वाचविण्यासाठी तो कॉल असल्याचे लक्षात आल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला, आणि पुढच्या क्षणी येथील ...