लॉकडाऊनमुळे प्रचंड आर्थिक कोंडी झाल्याने उत्तर नागपुरातील एक बहुचर्चित ढाबा संचालक तलावात उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र त्या भागात गस्तीवर असलेल्या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे त्याचा जीव वाचला. ...
लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेल्या वकिलांना ‘बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅण्ड गोवा’ने मदतीचा हात दिला आहे. कौन्सिलच्या वतीने गरजू वकिलांना एक महिना पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तूंची किट वितरित केली जात आहे. आतापर्यंत ५० वकिलांना किट देण्यात आली आहे. ...
पाचपावलीतील व्हीनस हॉस्पिटलमध्ये सात ते आठ गुंडांनी शनिवारी रात्री हैदोस घातला. रिसेप्शन काऊंटर, कॉफी मशीन, टीव्ही, मॉनिटर आणि इतर वस्तूंची तोडफोड करीत आरोपी शिवीगाळ करीत पळून गेले. ...
काही लोकांच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी मानून त्यापासून अंतर ठेवणे अयोग्य आहे. कुठल्याही समाजाविरोधात द्वेष किंवा शत्रूत्व बाळगू नका, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. ...
लॉकडाऊन तोडणाऱ्यांना आवरण्याची मोठीच कसरत पोलिसांना करावी लागत असल्याचे चित्र देशभरात दिसत आहे. या सर्व धामधुमीत पोलीस आणि लॉकडाऊन तोडणाऱ्यांमध्ये जो अजब संवाद होत आहे, तो अतिशय मजेदार आहे. ...
सीसीआयने खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेत एफएक्यू (फेअर एव्हरेज क्वॉलिटी) कापूस खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे नॉन एफएक्यू कापूस विकायचा कुणाला, असा प्रश्न राज्यातील कापूस उत्पादकांसमोर निर्माण झाला आहे. ...
जगप्रसिद्ध म्युच्युअल फंड कंपनी फ्रँकलिन टेम्पलटनने काल भारतात सुरू असलेल्या सहा म्युच्युअल फंड योजना तडकाफडकी बंद केल्याने गुंतवणूकदार विशेषत: ज्येष्ठ नागरिक व निवृत्तिवेतनधारक हादरले आहेत. ...
नागपुरात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येचा गावकऱ्यांनी धसका घेतला आहे. त्यामुळे बहुतेक गावकरी नागपूरकरांशी संपर्क टाळत आहेत. त्याचा फटका कृषी विभागाच्या खरीप पूर्वतयारीला बसत आहे. ...