इस्पितळात फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ‘सहायक’ रोबोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 07:27 PM2020-05-28T19:27:18+5:302020-05-28T19:30:04+5:30

कोरोनाच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सिंग राखणे हे सर्वात मोठे आव्हान झाले आहे. विशेषत: कोरोना वॉर्डात रुग्णसेवेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीच्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांनी संशोधन करून स्वयंचलित प्रणाली विकसित केली आहे.

Auxiliary robot to maintain physical distance in the hospital | इस्पितळात फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ‘सहायक’ रोबोट

इस्पितळात फिजिकल डिस्टन्सिंग राखण्यासाठी ‘सहायक’ रोबोट

Next
ठळक मुद्देव्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांचे संशोधन : कोरोना वॉर्डासाठी विकसित केली स्वयंचलित प्रणाली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या कालावधीत फिजिकल डिस्टन्सिंग राखणे हे सर्वात मोठे आव्हान झाले आहे. विशेषत: कोरोना वॉर्डात रुग्णसेवेचे प्रत्यक्ष काम करणाऱ्यांना संसर्ग होण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन व्हीएनआयटीच्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूूट ऑफ टेक्नॉलॉजी) विद्यार्थ्यांनी संशोधन करून स्वयंचलित प्रणाली विकसित केली आहे. सहायक नावाच्या या रोबोटच्या माध्यमातून रुग्णालयात रुग्णापर्यंत अन्न व औषधे सुरक्षितपणे पोहोचवले जाऊ शकतात.
व्हीएनआयटीच्या ‘आयव्हीलॅब्स’ रोबोटिक्स लॅबमध्ये काम करणाºया विद्यार्थ्यांच्या पथकाने रुग्णालयाच्या ट्रॉलीचे स्वयंचलित रोबोटमध्ये रूपांतर केले आहे. हा रोबोट वायरलेस नियंत्रित केले जाऊ शकतो. कोरोनाबाधित रुग्णांना अन्नाची पाकिटे व औषधे पोहचविण्यासाठी तसेच सुरक्षित अंतर राखण्यासाठी रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांकडून याचा वापर केला जाऊ शकतो. या रोबोटमध्ये एक डिस्प्ले स्क्रीन, कॅमेरा आणि एक स्पीकरदेखील सुसज्ज आहे. त्यामुळे डॉक्टर आपल्या जागेवरून रुग्णांशी व्हिडिओच्या माध्यमातून संवाद साधू शकतात. व्हीएनआयटीतर्फे एम्सला हा रोबोट देण्यात आला आहे.
एम्सच्या संचालकांनी असा रोबोट विकसित करण्याच्या विचारातून व्हीएनआयटीचे संचालक प्रा. प्रमोद पडोळे यांच्याकडे संपर्क साधला होता. त्यानंतर यांत्रिकी विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. शीतल चिद्दरवार यांच्या नेतृत्वात या प्रकल्पावर काम सुरू झाले. तृतीय व अंतिम वर्षाचे विद्यार्थी हर्षद झाडे, मोहम्मद सद, उद्देश टोपले, उन्मेष पाटील आणि आयव्हीलॅब्सच्या इतर सदस्यांच्या सहकार्यातून हा रोबोट एका आठवड्यात तयार झाला. विशेषत: विद्यार्थ्यांनी बरेचसे काम घरीच केले. व्हीएनआयटीचे माजी विद्यार्थी अजिंक्य कामत, रोहन ठक्कर, अंशुल पैगवार यांनीदेखील या प्रकल्पाला सहकार्य केले.
प्रा. पडोळे यांच्या हस्ते एम्स नागपूरच्या प्रोफेसर, फिजिओलॉजी विभाग, डॉ. मृणाल फाटक यांना हा रोबोट हस्तांतरित आला. याप्रसंगी एम्स नागपूरचे डॉ. सनीव चौधरी आणि डॉ. प्रथमेश कांबळे, व्हीएनआयटी नागपूरचे डॉ. अजय लिखिते व डॉ. शीतल चिद्दरवार हे उपस्थित होते.

एकावेळी १५ फूड पॅकेट नेण्याची क्षमता
वापरण्याची सोपी प्रणाली आणि कमी किंमत हे या रोबोटच्या डिझाईनचे मुख्य फायदे आहेत. यात मॉड्युलर डिझाइनर् पद्धती वापरली जाते. या रोबोटच्या माध्यमातून औषधे आणि सॅनिटायझरसमवेत एकावेळी १५ फूड पॅकेट वाहून नेऊ शकतात. एकदा पूर्णपणे चार्ज झाल्यावर, रोबोट सतत ४ तास काम करू शकतो. ५० मीटरच्या अंतरावरून हे रोबोट रिमोट कंट्रोलर आणि टॅब्लेटद्वारा ऑपरेट केले जाऊ शकतात. सहायक रोबोटला आणखी अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. रुग्णांच्या शरीराचे तापमान मोजण्यासाठी आणि मजल्यावरील साफसफाई करण्यासाठी आवश्यक ती यंत्रणा आणि थर्मल कॅमेरा बसवण्यात येणार आहे, अशी माहिती अजिंक्य कामतने दिली. हे विद्यार्थी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि संगणक दृष्टी तंत्र वापरून सहायक रोबोटची संपूर्ण स्वयंचलित आवृत्ती तयार करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

Web Title: Auxiliary robot to maintain physical distance in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.