भगवान गौतम बुद्ध यांच्या जयंतीनिमित्त येथील पवित्र दीक्षाभूमीवर बुद्धपौर्णिमेला दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी विशेष बुद्धवंदना घेतली व धम्मप्रवचन केले. ...
रक्त हवे असल्यास रक्तदाता आणा, असा अजब निर्णय कॉही रक्तपेढ्यांनी घेतला आहे. यामुळे दर १५ दिवसानी लागणाऱ्या रक्तासाठी कुठून रक्तदाता आणावा, असा प्रश्न रुग्ण व त्यांच्य पालकांना पडला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेले लॉकडाऊन, त्यात रक्तपेढ्यांच ...
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कार्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक जण कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षेसाठी घरातच थांबला आहे. मात्र कोरोना युद्धात अत्यावश्यक सेवेतील डॉक्टर, पोलीस, सफाई कर्मचारी व प्रशासनातील ...
उपराजधानीत कोरोनाचा प्रादुर्भाव सारखा वाढत आहे. त्यात आज एका पोलीस हवालदाराला बाधा असल्याच्या संशयावरून इस्पितळात भरती करण्यात आले असून, ११ पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आल्याने शहर पोलीस दलात खळबळ उडालीे आहे. या पार्श्वभूमीवर, पोलिसांचा आधारच काढून घ ...
लॉकडाऊन काळात आणि त्यानंतरसुद्धा राज्यात एकाही व्यक्तीचा भुकेमुळे मृत्यू होऊ नये. प्रत्येक गरजू व्यक्तीला आवश्यक प्रमाणात, गुणवत्तापूर्ण आणि परवडणाऱ्या दरात रेशन उपलब्ध व्हावे याकरिता रामटेकचे आमदार अॅड. आशिष जयस्वाल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या न ...
एप्रिलमध्ये शून्य विक्री नोंदविणाऱ्या वाहन उद्योगाला कोविड-१९ लॉकडाऊननंतर उत्पादन नव्याने सुरू करण्यासाठी सरकारकडून कर भरपाई, परतावा आणि सरकारच्या देयकावर स्थगिती मिळावी, अशी इच्छा आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यात पहिल्यांदाच एकाच दिवशी ४४ रुग्णांची नोंद झाल्याने खळबळ उडाली. नागपुरात रुग्णांची संख्या आता २०६ वर पोहचली आहे. यातच २२ वर्षीय मृताचा नमुना पॉझिटिव्ह आल्याने तिसऱ्या मृत्यूची नोंदही झाली आहे. ...
लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर कारवाई करताना पोलीस कर्मचारी मानवाधिकाराचे उल्लंघन करीत आहेत, असा आरोप करणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा दणका बसला. ...
नागपूर शहरातील सहा झोन बाधित रुग्ण आढळून न आल्याने कोरोनामुक्त होते. मात्र मंगळवारी नागपूर महापालिका हद्दीतील धंतोली झोन अंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर येथील एका २२ वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाचा दक्षिण-पश्चिम ...
मुंबईहून मध्य प्रदेशातील रिवाकडे निघालेल्या एका कामगाराच्या पत्नीला वाटेतच प्रसव कळा आल्या. तिची अवघडलेली अवस्था बघून सामाजिक कार्यकर्ते मदतीला धावले. गुमथळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचवून तिची सुखरूप प्रसुती झाली, तेव्हा कुठे सर्वांचा जीव भ ...