हुडकेश्वर व कळमना पोलिसांनी मंगलवारी रात्री दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन टोळ्यातील १० आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत काही आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. ...
चीनकडून सीमेवर करण्यात आलेल्या भ्याड कृत्याचा भारतीय जनता युवा मोर्चातर्फे बुधवारी निषेध करण्यात आला. ‘कोरोना’ची स्थिती लक्षात घेता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ पाळून पाच पाच कार्यकर्त्यांनी शहरातील सहा मंडळातील चौकांमध्ये चीनचा झेंडा जाळला. ...
कळमनाच्या पुनापूर रोडवर भरतवाडा बायपासवर कुख्यात तडीपार गुंडाची तलवारीने हल्ला करीत हत्या करण्यात आली. पाच-सहा आरोपींनी बुधवारी दुपारी त्याची हत्या केली. ...
सार्वजनिक बांधकाम विभागा(पीडब्ल्यूडी)चे मुख्य अभियंता उल्हास देबडवार यांची एका महिलने दोन लाख रुपयांनी फसवणूक केली. यासंदर्भात देबडवार यांनी सदर पोलिसात तक्रार केली असता, पोलिसांनी अज्ञात महिलेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. ...
कुख्यात प्रीती दास ऊर्फ हसीना आप्पा हिने आपल्याला ४९ ते ५० लाख रुपयांनी गंडविले, असा तक्रार अर्ज इर्शाद नामक व्यक्तीने आज पाचपावली पोलिस ठाण्यात दिला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी प्रीतीच्या चौकशीत थेट लक्ष घालणे सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर प्रीती द ...
नागपुरात बुधवारी २७ नमुने पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आता कोविड-१९ च्या रुग्णांचा आकडा १,१०५ झाला आहे. तर कन्हान कांद्रीच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या १८ झाली आहे. ...
एमआयडीसी येथील एसएस कंपनीच्या सहायक लेखापालाने कार्यालयातील आलमारीतून ३.५० लाख रुपयांचा चेक चोरून दुसऱ्याच्या बँक खात्यात जमा केला. त्यातील २० हजार रुपयांची रक्कम स्वत: काढून कंपनीच्या मालकाची फसवणूक केली. ...
नागपूर जिल्ह्याबाहेर शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना ऐन खरीपाच्या महत्त्वाच्या हंगामात पासची डोकेदुखी वाढली आहे. नागपूरलगतच्या वर्धा, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात शेती असणाऱ्या शेतकऱ्यांची सीमाबंदी नाक्यावर अडवणूक होत आहे. ...
शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मागणी केल्यानंतर बँकांनी खरीप कर्जपुरवठ्याची गती वाढवून सुलभपणे कर्जपुरवठा होईल, यासाठी नियोजन करावे. कर्जपुरवठ्याची गती वाढवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी विविध राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांच्या प ...