कामठी उपजिल्हा रुग्णालयातील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत. ...
ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत. ...
यंदा जागा घटल्याने प्रवेशाचा टक्का वाढण्याची शक्यता असल्याचे अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत. २०१४ सालापासून ६ वर्षांत राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयांतील ३५ हजारांहून अधिक जागा कमी झाल्या आहेत हे विशेष. ...
नागपूर रेल्वेस्थानकावर दररोज सात ते आठ रेल्वेगाड्या येतात. या रेल्वेगाड्यात बसण्यासाठी बाहेर प्रवाशांच्या रांगा असतात. त्यांच्यात ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चे पालन करण्यात येत नाही. ...
संघ लोकसेवा आयोगाच्या २०१९ ला झालेल्या यूपीएससी परीक्षेत नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेशी निगडित असलेल्या प्रज्ञा कैलास खंदारे यांनी ७१९ व्या रॅँकसह यश प्राप्त केले आहे. ...
पावसाळ्यामुळे शहरातील सर्व भागातील डांबरी रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिक व वाहनधारक त्रस्त आहेत. दुसरीकडे सात महिन्यात ४,३५५ खड्डे बुजविल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. ...
जिल्हा परिषदेतील दोन अधिकाऱ्यांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये धास्तीचे वातावरण आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण लक्षात घेता कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, अशी कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये आहे. ...