भरधाव ऑटो पलटला, महिला गंभीर जखमी
By दयानंद पाईकराव | Updated: January 20, 2024 14:47 IST2024-01-20T14:47:32+5:302024-01-20T14:47:44+5:30
ऑटोचालकाने नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उंटखाना आर्मी मेससमोर आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविला.

भरधाव ऑटो पलटला, महिला गंभीर जखमी
नागपूर : भरधाव वेगाने ऑटो चालविल्यामुळे ऑटो पलटी होऊन एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३ जानेवारीला सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
वर्षा दिलीप चौधरी (वय ४२, रा. तारसा रोड, कन्हान) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या बुधवारी ३ जानेवारीला सकाळी आपल्या कामावर जाण्यासाठी कन्हान येथून ऑटो क्रमांक एम. एच. ४९, ए. आर-८६७० ने जात होत्या. ऑटोचालकाने नविन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत उंटखाना आर्मी मेससमोर आपल्या ताब्यातील ऑटो भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालविला. त्यामुळे ऑटो अनियंत्रीत होऊन पलटी झाला. यात वर्षा गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या प्रकरणी मनिष निळकंठ अंबाडारे (वय ४०, रा. हेमराज पाटील यांचा वाडा नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून नविन कामठी पोलिसांनी आरोपी ऑटोचालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, सहकलम १८४ नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.