शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
6
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
7
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
8
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
9
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
10
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
12
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
13
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
14
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
15
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
16
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
17
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
18
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
19
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
20
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...

‘शालीमार’चा ओव्हर हेड वायर तुटल्याने खळबळ, अनेक गाड्यांचा खोळंबा

By नरेश डोंगरे | Updated: November 30, 2024 01:14 IST

बराच वेळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन दुरूस्ती केल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तोवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

नागपूर : शालीमार एक्सप्रेसचा ओएचई वायर तुटल्यामुळे नागपूर-हावडा रेल्वे मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला. शुक्रवारी दुपारी कामठीजवळ ही घटना घडली. बराच वेळ रेल्वे कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेऊन दुरूस्ती केल्यानंतर या मार्गावरची वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तोवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.

कामठीच्या रमानगर रेल्वे चाैकीजवळ ५६४ लेवल क्रॉसिंगवर लोकमान्य टिळक शालीमार एक्सप्रेसचा पेंटो ओएचई (ओव्हर हेड वायर) अडकला आणि त्यामुळे तो तुटून पडला. ज्यामुळे ही गाडी रेंगाळली. ते लक्षात येताच या मार्गावरच्या दोन्हीकडून येणाऱ्या-जाणाऱ्या गाड्यांचे संचालन काही वेळेसाठी बंद करण्यात आले. परिणामी ट्रेन नंबर १२१५१ समरस्ता एक्सप्रेस, १२२२२ हावडा-पुणे दुरंतो एक्सप्रेस, १२८४४ अहमदाबाद पुरी एक्सप्रेस जी कामठीकडे निघाली होती, त्या गाड्यांना जागच्या जागीच थांबविण्यात आले. दरम्यान, ओएचई तुटल्याचे कळताच रेल्वेच्या वरिष्ठ अभियंत्यांसह कर्मचाऱ्यांचे पथक तेथे पोहचले. वायर पुरता क्षतिग्रस्त झाल्यामुळे तो दुरूस्त करण्यासाठी बराच वेळ लागणार असल्याचे लक्षात आल्यामुळे डाऊन लाईन बंद ठेवून अपलाईन सुरू करण्यात आली. याच लाईनवरून दोन्हीकडच्या गाड्या पास करण्यात आल्या. तब्बल तास दीड तासांच्या परिश्रमानंतर ओएचईची दुरूस्ती करण्यात यश आले. दरम्यान दुरूस्तीच्या कामात विलंब झाल्यामुळे ट्रेन नंबर २०८२५ बिलासपुर-नागपुर वंदे भारत एक्सप्रेस, १२४०९ रायगड़-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस, ०८२८२ बिलासपूर स्पेशल, ०९७१४ बालाघाट मेमू आदी गाड्या प्रभावित झाल्या. मुंबई हावडा एक्सप्रेसलाही बराच वेळ नागपूर स्थानकावर थांबवून ठेवण्यात आले.हावडा लाईनच्या गाड्यांना फटका

या प्रकारामुळे हावडा लाईनवर धावणाऱ्या गाड्यांना जोरदार फटका बसला. या गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आणि त्यांच्या नातेवाईकांनाही या एकूणच प्रकारामुळे प्रचंड मनस्ताप झाला.

टॅग्स :railwayरेल्वे