संकटावर मात,यशाची मिळाली साथ
By Admin | Updated: June 14, 2017 01:06 IST2017-06-14T01:06:32+5:302017-06-14T01:06:32+5:30
सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़

संकटावर मात,यशाची मिळाली साथ
सुखी माणसाचा सदरा कुणाला शोधूनही सापडत नाही म्हणतात़ पण, म्हणून काही सुखाचा शोध घेणे थांबत नाही़ ज्यांना विश्वास असतो आपल्या कर्तृत्वावर अन् ज्यांच्यात धमक असते जग बदलण्याची ते घालतात घाव अंधारलेल्या रात्रीच्या माथ्यावर आणि ओढून आणतात यशाची मंजुळ पहाट. प्रतिकूलतेच्या परिस्थितीत यशाचा मंगलकलश खेचून आणणाऱ्या या विद्यार्थ्यांचेही असेच आहे़...
अपंगत्वाचा बाऊ न करता, जिद्दीने अभ्यास करून, दहावीच्या परीक्षेत योगेश्वर प्रकाश ठाकरे या अंध विद्यार्थ्याने यशाची पताका लावली आहे. योगेश्वरने ९० टक्के गुण घेत बोर्डातून पहिला येण्याचा मान पटकाविला.
रुचिकाला ९८ टक्के गुण प्राप्त झाले आहे. तिचे वडील हे व्यवसायाने ‘पेंटर’ आहेत. आर्थिक परिस्थिती आणि सोबतच गतिमंद असलेल्या लहान भावाची जबाबदारी असे आव्हान पार करून रुचिकाने वर्षभर अभ्यास केला.
रेशीमबाग मैदानाजवळ वडील गाड्यांच्या पंक्चर दुरुस्तीचे काम करतात. सिरसपेठ येथे राहणाऱ्या प्रतीक श्रीधर कोंतमवार याने विपरीत परिस्थितीवर मात करीत ९५ टक्के गुण मिळविले.
जीवनात सर्वात मोठा अडथळा माझे अपंगत्व नाही. सर्वात मोठे अपंगत्व मनुष्याच्या विचारात असते. अपंगत्वावर मात करीत ७७ टक्के गुण घेणाऱ्या राजेंद्र दौलत पाटील याचे मत आहे.
आईसोबत बाजारात भाजी विकून घराला हातभार लावणाऱ्या प्रीतीने ८७.२० टक्के गुण मिळविले आहे. शिक्षणाची ओढ असेल तर परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही, असा तिचा विश्वास आहे.