शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोगाने एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित: डॉ. चंद्रशेखर मेश्राम

By सुमेध वाघमार | Updated: January 30, 2024 18:26 IST

रोगाची माहिती असणेही गरजेचे असल्याचे व्यक्त केले मत

सुमेध वाघमारे, नागपूर: दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (एनटीडी) म्हणजे, ‘सिस्टीसरकोसिस’. यात डेंग्यू, चिकुनगुनिया, चागास डीसीस, ड्रॅकनकुलियासिस ( गिनी वर्म रोग), इकिनोकोकोसिस, मानवी आफ्रिकन ट्रीपॅनोसोमियासिस (झोपेचा आजार) लेशमॅनियासिस, कुष्ठरोग, हत्तीरोग, ऑन्कोसेरसियासिस (रिव्हर ब्लाइंडनेस) रेबीस, खरूज, सिस्टोसोमियासीस आदी रोगांचा समावेश होतो. या रोगाने जागतिक स्तरावर एक अब्जाहून अधिक लोक प्रभावित होतात. यामुळे याची जनजागृती होणे गरजेचे असल्याच, ट्रॉपिकल न्यूरोलॉजी स्पेशॅलिटी ग्रुपचे अध्यक्ष आणि वर्ल्ड फेडरेशन आॅफ न्यूरोलॉजीचे विश्वस्त पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे.

जागतिक उपेक्षित उष्णकटिबंधीय रोग दिवस हा दरवर्षी ३० जानेवारीला जगभरात पाळला जातो. त्या निमित्ताने त्यांनी ही माहिती दिली. डॉ. मेश्राम म्हणाले, ‘एनटीडी’ हे जगातील सर्वात गरीब प्रदेशांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. जेथे पाण्याची सुरक्षा, स्वच्छता आणि आरोग्य सेवा निकृष्ट दर्जाची असते. 

‘एनटीडी’ मुक्त जग करा

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक, डॉ. टेड्रोस अधानोम गेब्रेयसस, म्हणाले ‘एनटीडी’ मुक्त जग साध्य करण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. ‘एनटीडी’मधील बरेच रोग टाळता येण्याजोगे आहेत, त्यासाठी जनजागृती गरजेची आहे. 

न्यूरोसिस्टीसरकोसिस दरवर्षी ५० लाख लोकांना

डॉ. गेब्रेयसस म्हणाले, न्यूसिस्टीसरकोसिस हा आजार टेनिया सोलियम किंवा फीत जंतांच्या अळ्या पासून होतो. मेंदूमध्ये सिस्टीसरकोसिस च्या अळ्या जाणे हे मिरगी येण्याचेमहत्वाचे कारण असते.  दरवर्षी जगात ५० लाख लोकांना याचा संसर्ग होतो, आणि ५० हजार लोकांचा मृत्यू होतो. जिथे डुकरांची संख्या जास्त असते तिथे या आजाराचे प्रमाण अधिक असते.

डुकरांच्या मांसाला नाही म्हणा

इंडियन अकादमी आॅफ न्यूरोलॉजीचे माजी अध्यक्ष डॉ. गगनदीप सिंग यांनी सांगितले, भारतात न्यूरोसिस्टीरकोसिसशी संबंधित सक्रिय एपिलेप्सी प्रकरणांची संख्या १० लाखांहून अधिक आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओरिसामध्ये याचे प्रमाण अधिक आहे. पंजाबमध्ये डुकराचे मांस खाल्ले जात असल्याने सिस्टिरकोसिसशचे अधिक रुग्ण आढळून येतात. यामुळे डुकरांचा मांसाला नाही म्हणा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरnagpurनागपूर