नागपूर शहरात ८० हजारांवर मोकाट कुत्रे : व्हीटीएसचा सर्वे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 20:56 IST2019-09-16T20:55:50+5:302019-09-16T20:56:54+5:30
महापालिका प्रशासनाने व्हीटीएस फॉर अॅनिमल संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा सर्वे केला आहे. यात नागपूर शहरात ८० हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याची आढळून आले आहे.

नागपूर शहरात ८० हजारांवर मोकाट कुत्रे : व्हीटीएसचा सर्वे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांमुळे घाण पसरते. मोकाट कुत्र्यांसदर्भात नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने यावर उपाययोजना करण्यासाठी व्हीटीएस फॉर अॅनिमल संस्थेच्या माध्यमातून मोकाट कुत्र्यांचा सर्वे केला आहे. यात शहरात ८० हजारांहून अधिक मोकाट कुत्रे असल्याची आढळून आले आहे.
नागरी लोकसंख्येच्या तुलनेत मोकाट कुत्र्यांची संख्या सरासरी ३ टक्के असते. शहरालगतच्या भागात ती अधिक आहे. उत्तर व पूर्व नागपूर तसेच मध्य भागात कुत्र्यांची संख्या अधिक आहे. तर सिव्हिललाईन सारख्या भागात कुत्र्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. कुत्र्यांची विभाग् निहाय गणना विचारात घेता नसबंदीचा उपक्रम राबविला जात आहे.
सर्वेक्षणात यापूर्वी नसबंदी करण्यात आलेले, नसबंदी न झालेले याचा वेगवेगळा डाटा तयार तयार करण्यात आला आहे. सोबत कुत्र्यांची लहान पिले व गर्भधारणा झालेली कुत्र्यांचीही माहिती संकलीत करण्यात आली आहे. त्यानुसार नसबंदीचा व्यापक कार्यक्रम राबविला जात आहे. सध्या शहरात भांडेवाडी व महाराजबाग येथे ननसबंदी केंद्र सुरू आहेत. लवकरच नसबंदी केंद्राची संख्या वाढविली जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
नागपूर शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दरवर्षी शहरातील ७ ते ८ हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडतात. रात्रीला कामावरुन घरी परतणाऱ्यांरे कुत्र्यामुळे दहशतीत असतात. कुत्र्यांच्या संख्येला आळा घालण्यासाठी व्हीटीएस फॉर अॅनिमल संस्थेने सर्वेक्षण केले आहे. या संस्थेने यापूर्वी गोवा येथील मोकाट कुत्र्यांची गणना केली आहे.
साडेपाच महिन्यात ३,५०० नसबंदी
शहरातील मोकाट कुत्र्यांवर नसबंदी करण्याचा उपक्रम राबविला जात आहे. यासाठी प्रभागनिहाय डाटा संकलीत करण्यात आला आहे. शहरातील नसबंदी झालेले व न झालेल्या कुत्र्यांचा डाटा उपलब्ध झाला आहे. त्यानुसार नाबंदीचा उपक्रम राबविला जात आहे. मागील साडेपाच महिन्यात ३,५०० कुत्र्यांवर नसबंदी करण्यात आली आहे.
डॉ. गजेंद्र महल्ले, पशुचिकित्सक महापालिका