शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
4
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
5
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
6
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
7
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
8
निवडणुकीच्या रणधुमाळीत एलपीजी सिलेंडर पुन्हा स्वस्त, किमतीमध्ये एवढी झाली घट
9
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
10
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
11
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
12
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
13
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
14
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
15
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
16
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
17
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
18
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
19
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही
20
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला

नागपूर शहरात डासांचा प्रकोप वाढला : मनपा निद्रावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 9:00 PM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, शहरात डासांचा प्रकोप वाढत आहे. अधेमधे बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यांमुळे डासांची संख्या वाढत असून, शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देफॉगिंग बंद असल्याने नागरिक संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असतानाच, शहरात डासांचा प्रकोप वाढत आहे. अधेमधे बरसणाऱ्या पावसामुळे साचणाऱ्या डबक्यांमुळे डासांची संख्या वाढत असून, शहरातील प्रत्येक भागात ही समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवत असल्याचे स्पष्ट होत आहे.आधीच मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची समस्या नागपूरकर भोगून आहेत. त्यात कोरोना संक्रमणाचे संकट निर्माण झाले आहे कोरोनामध्ये तीव्र ताप आणि कोरडा खोकल्यासह घशात दुखण्याची लक्षणे आहेत. डेंग्यूमध्येही तीव्र ताप असतो. डेंग्यूवर आतापर्यंत कोणतीच व्हॅक्सिन निघालेली नाही. अशा चहुबाजूंनी निर्माण होणाऱ्या संकटामुळे डासांवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे. असे असतानाही मनपा प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येते. फॉगिंग मशीन बंद आहे. मलेरिया-फायलेरिया विभागाकडे नगरसेवकांकडून फॉगिंग मशीनची मागणी झाल्यास, विभागाकडून पेट्रोल-डिझेलचा तुटवडा असल्याचे कारण पुढे केले जाते. शहराच्या मध्यभागात असलेल्या प्रभाग क्रमांक १५ मध्ये प्रमुख मार्केटसोबतच नागरिकांची वहीवाटही आहे. येथे डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो. रामदासपेठ, धंतोली या भागात मोठ्या संख्येने इस्पितळे आहेत. या भागात डासांचा प्रकोप वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. सीताबर्डी, गोकुळपेठ, रामदासपेठ, शिवाजीनगर, आरटीओ विभाग, धरमपेठ, शंकरनगर, बजाजनगर, महाराज बाग, हिस्लॉप कॉलेज, पत्रकार कॉलनी या भागातही डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये अविकसित ले-आऊट्सची भरमार आहे. मोकळे भूखंड, झुडपांची संख्या येथे जास्त आहे. येथे डासांचा प्रकोप प्रचंड वाढला आहे. या प्रभागात भारतनगर, गुलमोहरनगर, विजयनगर, लक्ष्मीनगर, शिक्षक कॉलनी, भरतवाडा रोड परिसर, पारडी, पुनापूरमध्ये संध्याकाळच्या वेळी डासांचा प्रकोप वाढलेला असतो. त्यामुळे नागरिकांचे घरात राहणे कठीण असते तर प्रभाग २६ मध्ये भांडेवाडी परिसर येतो. या भागात कचरा डम्पिंग  यार्ड आहे.डम्पिंग यार्डमुळे तसेही या भागातील नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. त्यातच डासांचे संकट कोसळले आहे. जवळच वाठोडा भाग येतो. येथे नागरिकांना घरात आणि घराबाहेर उभे राहणे तारेवरची कसरत झाली आहे. प्रभाग २७ मधील नंदनवन कॉलनी, नंदनवन झोपडपट्टी, हसनबाग, सद्भावनानगर, कवले क्वॉर्टर, श्रीनगर, ओमनगर, नेहरूनगर, सुदामपुरी, भांडेप्लॉट, बापूनगर, आयुर्वेदिक ले-आऊट, मीरे ले-आऊट, आनंदनगरातही डासांनी थैमान घातले आहे.डासांवर नियंत्रण मिळविण्यात मनपा अपयशीप्रभाग क्रमांक १५ चे भाजप नगरसेवक सुनील हिरणवार यांनी या भागात डासांमुळे निर्माण झालेल्या समस्येवर मनपाचे लक्ष वेधले आहे. कोरोनामुळे नागपूर ‘लॉकडाऊन’ झाले. नागरिकांच्या हिताचा हा निर्णय योग्य आहे. मात्र डासांचा सामना रोजच करावा लागतो आणि त्यापासून सुटका मिळवून देण्यात मनपा पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.मनपाने उपाययोजना कराव्याविरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी डासांच्या समस्येवर योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहराच्या सीमावर्ती भागापासून ते मध्यवर्ती व पॉश भागातही डासांचा प्रकोप वाढला आहे. योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा गंभीर आजारांचा प्रकोप वाढण्यास वेळ लागणार नाही. नागरिक कोरोनामुळे आधीच भयभीत झाले आहेत. अशाात डेंग्यू, मलेरियाचा आजार वाढल्यास शहरात हाहाकार माजेल, अशी भावना वनवे यांनी व्यक्त केली.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका